पोस्ट्स

2021 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दृष्टीकोन आयुष्याकडे नव्याने बघण्याचा ..................

इमेज
                    आपण काहीतरी ठरवावं आणि सगळं त्याप्रमाणे घडावं असं  खरं तर प्रत्येकालाच  वाटत असतं. लहान मुलांपासून तर मोठ्यानं अगदी हेच हवं असतं. पण वास्तवात  प्रत्येकवेळी  सगळंच आपल्या मनासारखं  घडतंच असं नाही. कमी-जास्त तर होतंच . मना सारखं घडलं  नाही की  दुःख होतं. जेव्हा काही मनासारखं घडतं  तेव्हा आपल्याला सुख मिळतं  आणि जेव्हा मनासारखं  नाही घडत तेव्हा दुःख होतं .आयुष्यात  सुख आणि दुःख ह्या बद्दल प्रत्येकाची व्याख्या वेगळी असते. सुख आणि दुःख याचे आपण असे विशेष मापदंड ठरवू शकत नाही , जसे की ह्या काही ठराविक गोष्टींच्या  असण्यामुळे किंवा  घडल्यामुळे आनंद (सुख ) आणि दुःख  मिळतो . या गोष्टीचं  प्रत्येकाला त्याचं  व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे कि  त्याने कोणत्या गोष्टींत आनंद (सुख) आणि दुःख मानायचं आणि आयुष्यात जे  काही मिळाले आहे ते कसं  स्वीकारणं  हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. कारण कोणतंही सुख (आनंद) स्वीकारण्यात आपण नेहमीच तत्पर असतो प...