मोठं ........
मो ठं ..... होणं म्हणजे नक्की काय ???? आणि कधी समजायचं मोठं झालोय ते. लहान असतांना आपल्यापैकी बऱ्याच जणांना पडलेला हा प्रश्न आणि त्यात आपण जर भावंडात लहान असतो तेव्हा तर खूप वेळा मनात आलेला , परिस्थिती अनुभवतांना पडलेला हा प्रश्न ( मी कुटूंबात शेंड फळ आहे म्हणूनच हे मी अगदी माझ्या स्वानुभवावरून सांगतोय 😀😀) त्यावेळी तू हे करू नकोस लहान आहेस . लहानपणी एखाद्या गोष्टीसाठी हट्ट केल्यावर तू मोठा झाल्यावर नक्की असं म्हणून सगळ्यांच्या पालकांनी ती हट्टाची वेळ कितीतरी तरी वेळा सहज हाताळली असतेच. मोठ्या माणसाबद्दल सर्व सामान्य कल्पना अशी की सदर व्यक्ती जर एखाद्या उच्चपदावर कार्यरत असेल , जर त्यांच्याकडे खूप आर्थिक विद्वत्ता असेल , त्याच्या खूप प्रसिद्ध आणि उच्चपद घोषवणाऱ्या व्यक्तींसोबत नियमित उठणं -बसणं असणाऱ्याला तो व्यक्ती मोठा माणूस आहे असं म्हंटलं...