पोस्ट्स

2022 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पत्रास कारण की ..............

इमेज
                         परवा  सहजच बाहेर निघालो तेव्हा खाकी वेशात , टोपी घातलेला , एक विशिष्ट बॅग  खांदयावर घेऊन जातांना  एक व्यक्ती दिसला आणि ती  व्यक्ती दुसरा तिसरा कोणीही  नसून पॊस्टमन काका आहेत हे लक्षात आलं . आजच्या २१ व्या शतकात ' पत्र '  बऱ्याच लॊकांना outdated वाटतं  . Email , WhatsApp , Telegram , SMS व  अजून इतर यांच्या काळात ' पत्र ' कुठे आणि कधी हरवलं  हे लक्षातच आलं  नाही कधी . आजच्या नव्या पिढीसाठी 'पत्र ' ही  संकल्पना  राहिलेलीच  नाही , आणि संदेश वहनासाठी पत्र  आणायला, ते लिहायला , ज्याला पाठवायचं  आहे त्याचा पत्ता शोधून , ते Post Office / Post Box पर्यंत जाऊन ते  त्यात टाकायला , परत  त्या टाकलेलं  पत्र  मिळाल्यानंतर त्याचा  प्रतिसाद मिळेल तो पर्यंत थांबायला कोणाला वेळ आहे  ?????  आज का जमाना सब  Instant   का है .  मला वाटलं मी लगेच phone  केला, Video  Call   केला , ...

आई ..........

इमेज
                                                                                   आई..... प्रत्येकाच्या आयुष्याचा एक खूप महत्वाचा भाग असतो . खरं  तर आई आहे म्हणूनच हे  आयुष्य आहे.  मी परमेश्वर मानतो आणि मी हे कुठे तरी वाचलंय  की  परमेश्वराला सगळयांची  एकाच वेळी काळजी घेणं शक्य नाही म्हणून त्याने ह्या पृथ्वीवर सगळ्यांना आई दिली जी  सगळ्यांची  काळजी घेते, सगळ्यांना प्रेम देते .माणसापासून तर प्राण्यापर्यंत सगळ्यासाठी हा निर्सगाचा  नियम आहे.  आपल्या शास्त्रात सुद्धा आईला खूप महत्व दिलेले आहे . कुठे मातृदेव भव आईला देव किंबहुना देवा पेक्षाही श्रेष्ठ मानलं आहे  तर आईचं  महत्व सांगण्यासाठी स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी हे सुद्धा सांगितले आहे.                     वास्तवात आ...

मित्र........

इमेज
                     खरं  तर परमेश्वराने आपण कधी जन्म घ्यायच्या, आपले आई वडील कोण , कोणत्या देशात, कोणत्या कुटूंबात जन्म घेणार हे निवडीचं  स्वातंत्र्य कोणालाच दिलं नाहीये  . ज्या कुटुंबात जन्माला येतो  बहीण भाऊ, आजी आजोबा आणि असंख्य असे नातेवाईक  ज्यांना आपण रक्ताची नाती म्हणतो ती आपोआपच मिळतात. पण  परमेश्वराने ' मित्र ' निवडीचं  पूर्ण स्वातंत्र्य प्रत्येकाला दिलंय . आपण कोणाला मित्र म्हणायचं , कोणासोबत मैत्री करायची ह्या साठी आपल्याला कोणीही कोणतंच  बंधन असु  शकत नाही .                     माझ्या मते  ' मित्र ' ह्याला कोणत्याही  कक्षेत त्याचं  असं  वर्गीकरण करूच शकत नाही . ' मित्र ' म्हटल्यावर त्याला चांगला मित्र आणि वाईट मित्र,  वयाचं , शिक्षणाचं , जातिचं , धर्माचं ,लिंगाचं  असं  कोणतंही बंधन आणि भेद करता येत नाही.  माणसाप्रमाणे इतर प्राणी  सुद्धा आपले  चांगले  मित्र असू शकतात .निसर...

शिक्षण.....

इमेज
                                                                               ज्याप्रमाणे अन्न, वस्त्र, निवारा ह्या माणसाच्या प्राथमिक गरजा आहेत. जसा जसा काळ बदलत गेला तसे तसे त्याचे स्वरूप आणि व्याप्ती वाढत गेली तरीही ह्या आजही माणसाच्या प्राथमिक मूलभूत गरजा आहेतच. ह्या गरजा सोबतच शिक्षण ही सुद्धा एक प्राथमिक गरज आहे. सृष्टीत  असणाऱ्या प्रत्येक जीव हा जन्मतः काहीतरी शिकून येतो. काही गोष्टी त्याला शिकवाव्या लागत नाही , जसे की लहान बाळाला भूक लागली की  ते रडायला लागते, हे त्याला  शिकवावं लागतं नाही. काही गोष्टी ह्या आपण जन्मतः घेऊन येतो तसेच काहीसे असते. श्वास घ्यायला नाही शिकवावं लागत. जन्म झाल्यावर आपोआपच तो घ्यायला आपण शिकतोच. जगणं हे माणसाला म्हणा किंवा  ह्या सृष्टीतल्या कोणत्याही सजीवाला कधीही  शिकवावं लागतं नाही.             ...

ती.............

इमेज
                    ८ मार्च  म्हणजे जागतिक महिला दिन. तसं  बघायला गेलं तर आपण गमतीत म्हणतोच  Every  Day  is  Women's  Day   ८ मार्च हा फक्त औपचारिकता म्हणून साजरी केला जातो . हा गमतीचा भाग सोडला तर ८ मार्च आल्यावर सगळ्यांना  ' ती '  ची आठवण येते.                      खरं तर ' ती ' ला असं  कोणत्याही नात्यात बांधता येणार नाहीच.  ' ती '   कधी प्रेमाने काळजी घेणारी जन्मदाती म्हणून आई  , तर कधी हक्काने रुबाब गाजवणारी बहीण म्हणून, कधी मनसोक्त गप्पा मारणारी मैत्रीण म्हणून, तर कधी प्रेमाची स्वप्न दाखवणारी प्रेयसी म्हणून,  तर office मध्ये सोबतीत  काम करणारी    सहकारी   (colleague) म्हणून, तर कधी आपली सहचारिणी म्हणून...... अश्या किती तरी  ' ती '   आपल्या आयुष्यात असतातच. निसर्गाने खर तर हा  ती आणि मी हा भेद कधी केलाच नव्हता. हा भेद खरं  तर आपणच निर्माण केला आ...

मनासारखं आयुष्य ........

इमेज
                                                                                      आज वैज्ञानिक दुर्ष्टीने बघायला गेलं  तर मन हे नक्की आपल्या शरीरात कुठे , कसे दिसते ह्या बद्दल संशोधन सुरू आहे पण तरीही ते कुठे आहे हे आजवर तरी कोणाला सांगता आलेलं  नाही. हे सगळं कितीही खरं असेलं तरीही सगळ्यांनाच मन आहे. प्रत्येकालाच आपलं  आयुष्य हे आपण ठरवल्याप्रमाणे घडावं असं नक्कीच वाटत असतं. आयुष्यात  सुख  आणि दुःख  ह्याची , ते कोणत्या गोष्टी आणि माध्यमांतून मिळतं  ह्या बद्दल प्रत्येकाचं वेगळं मत आहे. त्यामुळेच सुख आणि दुःख म्हणजे नक्की काय याबद्दलची अशी विशेष व्याख्या नाही. जेव्हा आपण ठरवलेली गोष्ट ती अगदी ठरवल्या प्रमाणे झाली / घडली तर आपल्याला सुख (आनंद -समाधान) मिळतं , आणि तेच जर त्या प्रमाणे घडलं  नाही तर दुःख होतं .        ...