पोस्ट्स

2020 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वेळेचं औषध ........ पुन्हा नव्याने उभारी घेण्यासाठी

इमेज
                      आयुष्यात असं  बऱ्याच वेळा होतं काही घटना घडतात त्यांचा आपल्या मनावर तसंच  आपल्या आयुष्यावरही परिणाम हॊतॊ. आपण आयुष्यात चांगल्या गॊष्टी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला आनंद मिळतॊ , त्या नेहमीच व्हाव्यात असं वाटतं . वास्तवात बघायला गेलं तर आनंद म्हणजे नक्की काय आणि तॊ कसा मिळावा  ह्या बद्दल प्रत्येकाचा विचार आणि  मत वेगळं असू शकतं  पण तरीही तॊ  कोणत्याही माध्यमातून मिळत असला तरीही तॊ स्विकारण्याची आपली नेहमी तयारी असतेच.  पण तेच दुःखाचा एखादा अनपेक्षित प्रसंग आलाच तर त्याला सामोरं जातांना  कठीण होतं. खरं तर कोणतंही दुःख स्विकारण्याची आपली कधीच तयारी नसते. त्यावेळी हे आपल्या सोबतच का ??? आता काय करणार ?? आपलं आता कसं  होणार ?? असे अनेक प्रश्न मनात येणं खूपच स्वाभावीक आहे.                      अश्या परिस्थितीत समोर जो प्रसंग आहे तॊ  स्विकारणं सगळ्यात जास्त महत्वाचं असतं , का...

थोडंसं  Sharing ........ 

इमेज
                                            Sharing हे खरं तर लहानपणा पासूनच आपल्या हे  घरात आणि  शाळेत शिकवलं जातं .आपल्याला मिळालेली गोष्ट ही  नेहमी आपल्या सॊबत असणाऱ्या लोकांसोबत वाटून घेतली पाहिजे. घरात एखादा चांगला पदार्थ आणला किंवा तॊ  बाहेरून आणला असेल तेव्हा आपण घरात  सगळ्यांनी वाटून  त्याचा आनंद घायचा हे बाळकडू लहानपणीच मिळतं . आपण देवाला जो नैवेद्य दाखवतो तो ह्या Sharing   चं  सर्वोत्तम उदाहरण आहे. प्रसाद कोणाला किती आणि कोणता मिळाला ह्या पेक्षा तॊ  उपस्थित असणाऱ्या सगळ्यांना  मिळायला हवा हे जास्त महत्वाचं असतं . प्रसादासाठी जे काही असेल अगदी तो साखर असो किंवा पेढा . त्यातला साखरेचा एक कण किंवा कधी जर पूर्ण पेढा जरी मिळाला तरी मिळणारं  समाधान हे सारखंच असतं . आपल्या मराठीत अशी म्हणंही  आहे. दिल्याने आपल्या कडे जे आहे ते वाढतं.                    ...

गुरु.........

इमेज
                                                                                                             जेव्हा एखाद्या माणसाचं व्यक्तिमत्व घडतं  तेव्हा शिक्षणासोबत आजूबाजूला असणारं  वातावरण, माणसं  ह्यांचा खुप प्रभाव असतॊ . ह्या सगळ्यांत माणूस वावरतो आणि त्याप्रमाणे  त्याचं व्यक्तिमत्व घडत असतं. माणूस हा जन्माला आल्यापासून तर मरे पर्यंत नेहमीच काही ना काही तरी शिकतच असतॊ. ज्यावेळी तॊ  शिकतो असं  आपण म्हणतो त्यावेळी ते शिक्षण हे फक्त शाळा, कॉलेज  आणि परीक्षेपुरतंच मर्यादित  नसतं. सगळ्याच गॊष्टींचे ज्ञान हे पुस्तकांतून  मिळेलच आणि पुस्तकांतूनच मिळतं असं नाही. काही गॊष्टींचे ज्ञान हे त्याला  इतरांच्या विचारातून, अनुभवातून येतं  तर काही गॊष्टी ह्या ताओ...

Instant.............

इमेज
खरं तर मराठी लेखाला इंग्रजी नाव देतांना तसे मराठीत बरेच पर्यायी शब्द होते जसे की  चटकन, पटकन इ.  पण  मला माझ्या ह्या विषयासाठी अनुरूप असे शब्द नाही वाटले  म्हणूनच Instant.....सगळ्यांना कसं एका चुटकीत हवं असतं ........  आपल्या fast forward जीवनात हवा हवासा वाटणारा शब्द . आज आपला कसा वेळ वाचेल याकडे कल असतो. आज प्रत्येक जण हा आपल्याला जमेल तसा वेळ वाचवण्याचा प्रयत्न करत असतो. इंग्रजीत अशी म्हण आहे " Time is money" म्हणूनच सगळे जण पैसा वाचवा , तो मिळवावा  म्हणून नेहमी प्रयत्न करतात. ह्याच प्रयत्नांचाच एक भाग म्हणून हा  Instant शब्द आपल्या शब्दकोशात कधी सामावून गेला आपल्यालाही कळलंच नाही आणि किंबहुना आपल्या आयुष्यात ह्या शब्दाचे एक वेगळंच महत्व आहे. लहानांपासून तर मोठयांपर्यंत सगळ्यांसाठी वेळेच महत्व आहे. मग हा वेळ वाचावा म्हणून आपला खूप प्रयत्न असतो. खाण्यापासून तर आपल्या रॊजच्या जीवनाशी निगडित असणाऱ्या गोष्टीत सगळंच आपल्याला अगदी Instant  हवं असतं . सकाळचा Instant चहा/ कॉफी , मग २ min  instant नूडल्स, fastfo...

देश आणि मी ......

इमेज
              आयुष्यात कोणताही गोष्ट सहज मिळाली तर तिची किंमत राहत नाही मग ते रोजच्याच आपल्या आयुष्यातल्या काही गोष्टी असो किंवा मिळालेलं स्वातंत्र्य असो. त्याची किंमत राहत नाही. आज जे बाहेर वातावरण आहे त्यावरून हे नक्कीच वाटतं कि आपल्या देशाला स्वातंत्र्य तर मिळालं पण आज त्याची किंमत , जाणीव मात्र आपण ठेवायला विसरतोय.              हवी असलेली एखादी गोष्ट/ वस्तू   मिळवण्यासाठी काहीच प्रयत्न करावे लागेले नसतील तर   त्या गोष्टीबद्दल जास्त   जाण रहात नाही , जरी ती गॊष्ट / वस्तू   आपल्यापासून दुरावली तरीही त्याचा जास्त त्रास , कष्ट होत नाही पण तेच जर आपण खूप कष्टाने ती वस्तू/गोष्ट जेव्हा मिळवतो , तेव्हा मात्र आपण तिला जपतो , तिची जाणीव ठेवतो. ती आपल्यापासून दुरावणार नाही याची काळजी घेतॊ आणि जरी दूर गेलीच तर पुन्हा प्रयत्न , कष्ट करून ती मिळवतोच. याचं   अगदीच एक साधं उदाहरण द्यायचे झालं तर एखाद्या दिवशी जेवणासाठी खूप प्रयत्न करूनही जेवणासाठी अन्नच मिळालं नाही त्...