मनासारखं आयुष्य ........
आज वैज्ञानिक दुर्ष्टीने बघायला गेलं तर मन हे नक्की आपल्या शरीरात कुठे , कसे दिसते ह्या बद्दल संशोधन सुरू आहे पण तरीही ते कुठे आहे हे आजवर तरी कोणाला सांगता आलेलं नाही. हे सगळं कितीही खरं असेलं तरीही सगळ्यांनाच मन आहे. प्रत्येकालाच आपलं आयुष्य हे आपण ठरवल्याप्रमाणे घडावं असं नक्कीच वाटत असतं. आयुष्यात सुख आणि दुःख ह्याची , ते कोणत्या गोष्टी आणि माध्यमांतून मिळतं ह्या बद्दल प्रत्येकाचं वेगळं मत आहे. त्यामुळेच सुख आणि दुःख म्हणजे नक्की काय याबद्दलची अशी विशेष व्याख्या नाही. जेव्हा आपण ठरवलेली गोष्ट ती अगदी ठरवल्या प्रमाणे झाली / घडली तर आपल्याला सुख (आनंद -समाधान) मिळतं , आणि तेच जर त्या प्रमाणे घडलं नाही तर दुःख होतं . ...