पोस्ट्स

2023 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अपयशातलं समाधान .......................

इमेज
                    अपयशातलं  समाधान वरील  हे शीर्षक वाचून थोडसं गोंधळलात  ना  ??  काही चुकीचे  वाचलंय ,   का शब्दांची अदलाबदल  झाली ?   असे विचार तुमच्या मनात येणं  अगदी स्वाभाविक आहे. कारण मुळात अपयश आणि समाधान हे तसे  परस्पर विरोधी शब्दच. आपण बघतो की अपयश असलं तर नेहमी त्यात दुःख आणि  निराशा असते  त्यात अपयश हे समाधान शब्दासोबत वाचायला थोडं  विचित्र वाटलं असेल . या शब्दातच खूप विरोधाभास आहे .पण हो मी म्हणतोय की अपयशातलं  समाधान..........                     ज्याप्रमाणे सुखः आणि दुःख म्हणजे नक्की काय , ते कसं आणि कशामुळे  मिळतं ह्या बद्दल प्रत्येकाचं  एक वेगळं  मत आहे,  तसंच यश-अपयश  या बद्द्दल सुद्धा नक्कीच असू शकतं. आणि ते मत आपण कोणावरही लादू शकत नाही. ज्याला - त्याला याचं स्वातंत्र्य नक्कीच आहे.  काहींना त्यांचा  आवडता पदार्थ खायला मिळाला तर त्यांना आनंद होतो काही...

Happy Ending.......................

इमेज
                                                   आज ज्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीला तिची एक ठराविक   Expiry Date   आहे. प्रत्येकाचा कालावधी कमी जास्त असेल पण एका ठराविक कालावधी नंतर ती  वस्तू / गोष्ट निरुपयोगी होते. त्यामुळेच त्या वस्तूला / गोष्टीला एका ठरविक , मर्यादित कालावधी पर्यंतच आपण तिचा वापर करू शकतो. तो कालावधी संपल्यानंतर आपल्याला त्या गोष्टी / वस्तू चा काहीही उपयोग होत नाही. ह्या सृष्टीत अशी कोणतीच गोष्ट नाही जी कायम राहणार आहे. प्रत्येकाचा कालावधी नक्कीच कमी-जास्त असेल पण कायम स्वरूपी राहणारी अशी एकही गोष्ट नाही. खरं तर हा सृष्टीचा नियमच आहे. जो कोणीही कितीही प्रयत्न केला तरीही बदलू शकणार नाही.                           आपण सुद्धा ह्या सृष्टीचा एक अविभाज्य घटक आहोत, त्यामुळे सृष्टीचा हा नियम आपल्याला सुद्धा तितक्याच कटाक्षाने  पाळावाच  लागतो....

सहजच.......

इमेज
                    सहज.... हा शब्द जितका लिहायला , एकायला सोपा वाटतो तितकाच जो जगण्याच्या बाबतीत आपण खूपच अवघड करून ठेवलेला आहे का असा प्रश्न मला नेहमी पडतो. आज संपर्क करण्यासाठी बरीच माध्यमे उपलब्ध आहेत त्यामुळे पटकन कोणा सोबत संपर्क साधता येतो. पण आज कोणतीही गोष्ट करण्यासाठी आपल्याला काहीतरी निमित्त -कारण हवंच . मी पुढे व्यक्त करत असलेल्या मताशी सगळेच सहमत असतीलच असे नाही. आज असा पटकन फोन उचलून कोणाला सहज च फोन शेवटचा कधी केलेला किंवा आपल्याला कोणी सहजच फोन केल्याचं आठवतंय ????? जरी आपल्याला वाटले की चला कोणाला तरी सहज फोन करूया किंवा सहजच भेटून येऊ , पण तोच लगेच मनात विचार येतो असे काहीही काम नसतांना का फोन केला म्हणून असं त्या समोरच्या माणसाला वाटेल  ह्याला उगाच काही काम नाही म्हणून तर ह्याने फोन तर नाही ना केला... आपली एक सर्व सामान्य मानसिकता झालेली आहे त्यामुळे कोणाला सहज  भेटायला जाण्याआधी , कोणाला फोन करण्याआधी विचार येतोच.आणि ह्या उलट कधी नव्हे कोणी फोन केला, अचानक घरी आले तर मनाला ही चुटपुट असते का फोन केला असेल, का...