पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पत्रास कारण की ..............

इमेज
                         परवा  सहजच बाहेर निघालो तेव्हा खाकी वेशात , टोपी घातलेला , एक विशिष्ट बॅग  खांदयावर घेऊन जातांना  एक व्यक्ती दिसला आणि ती  व्यक्ती दुसरा तिसरा कोणीही  नसून पॊस्टमन काका आहेत हे लक्षात आलं . आजच्या २१ व्या शतकात ' पत्र '  बऱ्याच लॊकांना outdated वाटतं  . Email , WhatsApp , Telegram , SMS व  अजून इतर यांच्या काळात ' पत्र ' कुठे आणि कधी हरवलं  हे लक्षातच आलं  नाही कधी . आजच्या नव्या पिढीसाठी 'पत्र ' ही  संकल्पना  राहिलेलीच  नाही , आणि संदेश वहनासाठी पत्र  आणायला, ते लिहायला , ज्याला पाठवायचं  आहे त्याचा पत्ता शोधून , ते Post Office / Post Box पर्यंत जाऊन ते  त्यात टाकायला , परत  त्या टाकलेलं  पत्र  मिळाल्यानंतर त्याचा  प्रतिसाद मिळेल तो पर्यंत थांबायला कोणाला वेळ आहे  ?????  आज का जमाना सब  Instant   का है .  मला वाटलं मी लगेच phone  केला, Video  Call   केला , ...