तो............................
तॊ ............. जन्माला आल्यापासून आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात मुलगा , भाऊ , मित्र , नवरा आणि बाबा ( वडील ) अशी विविध नाती तो सर्मथपणे सांभाळत असतो. विद्यार्थी दशेत चांगलं शिक्षण घेतलं तर तारुण्यात चांगली नोकरी/ व्यवसाय करता येईल. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर घरातले खर्च , घरात राहणाऱ्या माणसांची आर्थिक आणि मानसिक आरोग्य ह्याची जबाबदारी , त्यात कोणतीही परिस्थिती जर उद्भवलीच तर ते आर्थिक नियोजन करणं असतंच . लग्नासाठी साथीदार म्हणून त्याची निवड ही तो माणूस म्हणून कसा आहे ह्या पेक्षाही त्याच्या आर्थिक निकषांवर , त्याच्या वार्षिक उत्पन्नावर ( salary package) , तो कोणत्या शहरात राहतोय ह्यावरून त्याची निवड केली जाते. त्याच्यासाठी लग्नानंतर नव्या नात्यांसोबत जुळवून घेत असतांनाच असेलेली (जुनी) नाती तितक्याच प्रेमाने जपायची असतात. वडील म्हणून जबाबदारी स्वीकारतांना पाल्याला कोणत्याच गोष्टींची कमतरता पडू नये म्हणून ...