पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

प्रेम.............

इमेज
                    'प्रेम' या शब्दातच खरं तर खूप सारा अर्थ लपलेला आहे. आजपर्यंत प्रेमाबद्दल खूप जणांनी सांगितले आहे, बरंच  काही लिहलेलं आहे. नक्की प्रेम म्हणजे काय हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझ्या मते प्रेम दुसऱ्यांबद्दल  वाटणारी आदर आणि आपुलकीची भावना. ज्यात आदर आणि आपुलकी सॊबतच विश्वासही आहे. आपल्याला ह्या भावना ज्या कोणाबद्दल वाटतात त्यांच्यावर आपण प्रेम करतॊ असं म्हणायला काहीही हरकत नाही. माझ्या मते प्रेम आणि नातं ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांशी जुळलेल्या आहेत. ते असं कि , " आयुष्यात नेहमी प्रेम करून असलेली नाती आणखी घट्ट करावीत आणि प्रेम करून आणखी नवीन नाती जोडत जावी ".                     आज  मला असं वाटतं  की  आजच्या आपल्या प्रेमाबद्दलच्या असणाऱ्या विचारांवर चित्रपटांचा खूप प्रभाव आहे. त्यामुळेच आपलं प्रेम असण्याची ,ते व्यक्त करण्यात असणारा सहजपणा ,साधेपणा आपण विसरलोय. आजही काही लॊकांच्या मते  प्रेम म्हणजे एखादा मुलगा आणि मुलगी नेहमी सोबत एकत...