Instant.............
खरं तर मराठी लेखाला इंग्रजी नाव देतांना तसे मराठीत बरेच पर्यायी शब्द होते जसे की चटकन, पटकन इ. पण मला माझ्या ह्या विषयासाठी अनुरूप असे शब्द नाही वाटले म्हणूनच Instant.....सगळ्यांना कसं एका चुटकीत हवं असतं ........ आपल्या fast forward जीवनात हवा हवासा वाटणारा शब्द . आज आपला कसा वेळ वाचेल याकडे कल असतो. आज प्रत्येक जण हा आपल्याला जमेल तसा वेळ वाचवण्याचा प्रयत्न करत असतो. इंग्रजीत अशी म्हण आहे " Time is money" म्हणूनच सगळे जण पैसा वाचवा , तो मिळवावा म्हणून नेहमी प्रयत्न करतात. ह्याच प्रयत्नांचाच एक भाग म्हणून हा Instant शब्द आपल्या शब्दकोशात कधी सामावून गेला आपल्यालाही कळलंच नाही आणि किंबहुना आपल्या आयुष्यात ह्या शब्दाचे एक वेगळंच महत्व आहे. लहानांपासून तर मोठयांपर्यंत सगळ्यांसाठी वेळेच महत्व आहे. मग हा वेळ वाचावा म्हणून आपला खूप प्रयत्न असतो. खाण्यापासून तर आपल्या रॊजच्या जीवनाशी निगडित असणाऱ्या गोष्टीत सगळंच आपल्याला अगदी Instant हवं असतं . सकाळचा Instant चहा/ कॉफी , मग २ min instant नूडल्स, fastfo...