Instant.............

खरं तर मराठी लेखाला इंग्रजी नाव देतांना तसे मराठीत बरेच पर्यायी शब्द होते जसे की  चटकन, पटकन इ.  पण  मला माझ्या ह्या विषयासाठी अनुरूप असे शब्द नाही वाटले  म्हणूनच Instant.....सगळ्यांना कसं एका चुटकीत हवं असतं ........ 

आपल्या fast forward जीवनात हवा हवासा वाटणारा शब्द . आज आपला कसा वेळ वाचेल याकडे कल असतो. आज प्रत्येक जण हा आपल्याला जमेल तसा वेळ वाचवण्याचा प्रयत्न करत असतो. इंग्रजीत अशी म्हण आहे " Time is money" म्हणूनच सगळे जण पैसा वाचवा , तो मिळवावा  म्हणून नेहमी प्रयत्न करतात. ह्याच प्रयत्नांचाच एक भाग म्हणून हा  Instant शब्द आपल्या शब्दकोशात कधी सामावून गेला आपल्यालाही कळलंच नाही आणि किंबहुना आपल्या आयुष्यात ह्या शब्दाचे एक वेगळंच महत्व आहे.

लहानांपासून तर मोठयांपर्यंत सगळ्यांसाठी वेळेच महत्व आहे. मग हा वेळ वाचावा म्हणून आपला खूप प्रयत्न असतो. खाण्यापासून तर आपल्या रॊजच्या जीवनाशी निगडित असणाऱ्या गोष्टीत सगळंच आपल्याला अगदी Instant  हवं असतं . सकाळचा Instant चहा/ कॉफी , मग २ min  instant नूडल्स, fastfood ,आपले रोजचे वापरातले कपडे  त्यातही आपण आपण आपला वेळ वाचवतो. शर्ट ला बटन असतात म्हणून बटन नसलेले t -shirt  वापरण्या कडे आपला कल असतॊ. आपल्या gadgets  च्या माध्यमातूनही आपली कामे instant  होतात. आपले gadgets जसे की  mobile , laptop / computer खूप मोठी यादी आहे. यांना  सांगितलेली  / त्यांच्यावर करण्याची कामे ही  सुद्धा  instant होतात. ते आणखी पटकन व्हावी म्हणून आपण जमेल तसे  ते upgrade  सुद्धा करत असतॊ.

जसे वर्ष उलटत जाताय , आपणही वेळेच्या ह्या प्रवाहासोबत वाहत चाललोय. ह्याच प्रवाहाचा एकभाग म्हणून बऱ्याच गॊष्टी आपल्या आयुष्याचा एक नवीन भाग बनल्यात तर काही गोष्टींचे स्वरूप बदललं. तेव्हा प्रवाहासोबत राहायचं  ह्या गॊष्टी तर होणारच आहेत. ह्यात तशी बारीक उदाहरणे देता येतील. जसे की  पूर्वीचे चित्रपट किमान २ ते २.३० तास तरी असायचे मुघल-ए -आझम हा चित्रपट ३ तासांपेक्षाही मोठा आहे , तेव्हा लोक बघायचे , आणि तेच जर आज बघितलं तर १.५ तासापर्यंतचा चित्रपट लोकांना कधी संपतोय असं हॊऊन जातं , गाण्याच्या बाबतीत ही  असेच म्हणता येईल  पूर्वी ७  किंवा त्याही पेक्षा  अधिक मिनिट असणारी गाणी असायची आणि तेच आज ४ मिनिटाच्या वर गाणं ऐकूच  शकत नाही ( आजचे आणि  पूर्वीचे चित्रपट / संगीत ह्यांचे  विषय, कथा इ. हा विषय इथे चर्चेचा विषय नाही) यात क्रिकेट या खेळाचं उदाहरण मला आवर्जून द्यावंसं वाटतं . आधी ५-५ दिवस चालणाऱ्या रॊमहर्षक  टेस्ट मॅचेस चालायच्या त्या आजही आहेत , त्यानंतर एक दिवसीय  क्रिकेट सामना आला ज्यात आता सामन्याचा  निकाल यायला ५ दिवस थांबायची गरज नाही  ५०-५० षटकांच्या  सामना  ज्याचा ७-८ तासांत  निकाल येऊन सामना संपणार. आणि आता तर काय २०-२० चा जमाना  आहे. २. ३० तासांत सामना संपून , निकाल मिळणार.

ह्या वर उदाहरण देतांना  असं लक्षात आलं  की  आपल्यातला असणारा संयम आपण कुठे तरी गमावतोय का ? सगळंच आपल्या instant  हवं म्हणून आपल्या आयुष्यात ह्या गॊष्टी कळत नकळत कधी बदलून गेल्यात  आपल्याला लक्षात नाही आलं . त्यामुळे आपण आयुष्याकडे तसेच बघतो. सगळंच instant  व्हायला हवं . आणि ते जर पण ते instant  झाले नाहीत तर त्रास होतो, चिडचिड  होते. याचा आपल्या  शरीरासोबतच मनावरही  विपरीत परिणाम हॊतॊ. आणि याचे काही गंभीर परिणामही होऊ शकतात म्हणूनच जरी एखादी गोष्ट नाही instant  झाली तर आपण त्रास करून ना घेता ती गोष्ट पूर्ण होण्यासाठी तिला आवश्यक तॊ  वेळ दिला पाहिजे.

ज्यावेळी आयुष्याकडे बघतो त्यावेळी असे लक्षात  आलं  की  सगळ्यांच गोष्टींत आपण ती  instantly होतीलच असं  नाही . आयुष्यात अश्या त्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्यांना आपण ह्या instant  च्या मापदंडात कधी बसवूच  शकत नाही. नाते , प्रेम ,मैत्रीच्या  बाबतीतही तसेच आहे. प्रेम हे असं instantly  होत नसतं  कधी. नाते ,मैत्री  जुळण्यासाठी त्याला आवश्यक तॊ  वेळ दिला तर ते दिर्घकाळ टिकतं आणि त्याला आवश्यक तॊ  वेळ नक्कीच दिला पाहिजे असं  मला मनापासून वाटतं . अगदीच एक साधं उदाहरण देतो जे मी स्वतः अनुभवलं आहे. ज्यावेळी mobile सारखी माध्यमे नव्हती तेव्हा पत्र  लिहून एकमेकांची खुशाली समजायची . पत्र  लिहतांना त्या व्यक्ती बद्दल,  त्याच्या असणाऱ्या आठवणींत  रमून पत्र पाठवले जायचे  आणि ते पत्र त्या माणसाला मिळालं  असेल -नसेल, त्याला वाचून कसं  वाटलं असेल आणि त्याने पाठवलेल्या उत्तराची वाट बघत राहणं  हा अनुभव आज mobile  उचलून हव्या त्या माणसाला  क्षणार्धात phone  लावून बोलण्यात, त्याला बघण्यातही नाही अनुभवता येत.  हा असा अनुभव आहे जो शब्दांत व्यक्त नाही करता येणार. 

आधुनिक माध्यमांच्या सहाय्याने  माणसं  सहज जोडली जाणार आहेत. ह्यात  आपल्याला एक काळजी घायची  आहे ती म्हणजे आयुष्य हे instantly  न जगता  त्यात असणाऱ्या एक एक क्षणाचा आनंद  किंवा  दुःख  जे असले त्याला त्याचा जो आवश्यक वेळ आहे तो देऊनच जगावं असं  मला मनापासून वाटतं  कारण २ मिनिटात instant तयार हॊणाऱ्या Maggie त आणि आपल्या आयुष्यात खूप मोठा फरक आहे किंबहुना त्याची तुलना करणं हे अशक्यच आहे.. 

म्हणूनच मी म्हणतो आयुष्यात  सगळ्याच गॊष्टी ह्या instant  होतीलच आणि त्या व्हाव्यात हा दृष्टिकोन आपण नक्कीच बदलला पाहिजे........   

                                                                                                          सुनित कुलकर्णी 









टिप्पण्या

  1. खूपच छान आजच्या जीवन शैलीत सगळ्यांना अगदी instant गोष्टी हव्या असतात, अगदी साजेसा ब्लॉग

    उत्तर द्याहटवा
  2. खुपच सुंदर सुनित... असेच लेख लिहून लिंक पाठवत जा...

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तो............................

वेळेचं औषध ........ पुन्हा नव्याने उभारी घेण्यासाठी

शुभ विवाह .............