पोस्ट्स

2024 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नविन वर्ष ............

इमेज
                                         सांस्कृतिक दृष्टीने आपलं  नवीन वर्ष हे कोणत्याही महिन्यात / तिथीने सुरु हॊत असलं  तरीही आपल्या सगळ्यांच्याच  व्यावहारिक आयुष्यात तारखेला खूप महत्व आहे. आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात जन्माच्या दाखल्यापासून सुरु झालेला हा तारखांचा प्रवास आपल्या मृत्यूच्या दाखल्यापर्यंत अविरतपणे सुरूच असतो. आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यात काही विशिष्ट तारखा आणि काही  महिने ह्या खूप महत्वाच्या असतात आणि  त्याच्या अश्या बऱ्याच आठवणीही असतात .                       एक सहजच उदाहरण द्यायचं  झालंच  तर आपला / आपल्या जवळच्या माणसांचा पहिला  वाढदिवस,  जून महिन्यात असलेला पहिला शाळेतला दिवस, मार्च/ एप्रिल मध्ये असणाऱ्या शालांत  ( वार्षिक) परीक्षा, १० , १२ वीच्या असणाऱ्या फेब्रुवारी /मार्च महिन्यात असणाऱ्या परीक्षा,नॊकरीचा पहिला दिवस,  कोणतीही नव...

मोठं ........

इमेज
                    मो ठं ..... होणं म्हणजे नक्की काय ???? आणि कधी समजायचं मोठं झालोय ते.  लहान असतांना  आपल्यापैकी बऱ्याच जणांना पडलेला हा प्रश्न आणि त्यात आपण जर भावंडात लहान असतो तेव्हा तर खूप वेळा मनात आलेला ,  परिस्थिती अनुभवतांना  पडलेला हा प्रश्न ( मी कुटूंबात शेंड फळ आहे  म्हणूनच हे मी अगदी माझ्या स्वानुभवावरून सांगतोय 😀😀) त्यावेळी तू हे करू नकोस  लहान आहेस . लहानपणी एखाद्या गोष्टीसाठी  हट्ट  केल्यावर तू  मोठा झाल्यावर नक्की असं  म्हणून सगळ्यांच्या पालकांनी ती  हट्टाची वेळ कितीतरी तरी वेळा सहज हाताळली असतेच.                      मोठ्या माणसाबद्दल सर्व सामान्य कल्पना अशी की सदर  व्यक्ती  जर एखाद्या उच्चपदावर कार्यरत असेल , जर त्यांच्याकडे खूप आर्थिक विद्वत्ता असेल , त्याच्या खूप प्रसिद्ध आणि  उच्चपद घोषवणाऱ्या व्यक्तींसोबत नियमित उठणं -बसणं  असणाऱ्याला तो व्यक्ती मोठा माणूस आहे असं  म्हंटलं...

बाबा .....

इमेज
                           बाबा .... असं   व्यक्तिमत्व जे प्रत्येकाच्याच आयुष्यातला एक महत्वाचा भाग असतॊ . फक्त आपल्या नावाला ओळख देण्याइतकंच  नाही तर त्याहून कितीतरी पट  जे कधीच शब्दांत  मांडता येणार नाही असे. आपले बाबा .... जे प्रत्येकासाठी त्यांच्या आयुष्यातले पहिले हिरो/ प्रेरणा असतात . विश्वासाने ज्यांचं बोट अगदी घट्ट धरून कोणत्याही प्रवासासाठी नेहमी तयार असायचो, ज्यांच्या  खांद्यावर उभं राहून हे जग बघतांना  . आपल्याला नेहमीच त्यांच्या सारखंच बनायचं असतं हे बाबाच असतात. लहानपणी त्या भातुकलीच्या खेळात कितीतरी वेळा त्यांचं अनुकरण केलेलं असेलंच.                           खरं तर बाबांबद्दल मी काय लिहणार ?????  कसं  लिहणार ??????  ज्यांना मी २९ वर्षांपूर्वी गमावलं , खूप लहान असल्यामुळे  ज्यांचा मला खूप सहवासही  नाही मिळाला , जास्त आठवणी सुद्धा नाहीत. फोटोतल्या काही थोड्या आठवणी आहेत इतकंच ....

शुभ विवाह .............

इमेज
                              मनुष्य  हा जन्माला आल्यापासून तर  मृत्यू पर्यंत त्याच्या आयुष्यात काही टप्पे  येतात. जसे की बालपण, तारुण्य आणि वृद्धत्व. जितकं माणसाचं आयुष्य त्याप्रमाणे तॊ  ह्या टप्प्यातून जात असतो. आपल्या संस्कृतीत आपल्या पूर्वजांनी खूप विचार करून आणि खूप दूरदृष्टी ठेवूनच ह्या टप्प्यात असलेल्या वयात कोण- कोणत्या गोष्टींना महत्व द्यायचं ह्याची आपल्या शास्त्रांत  खूप सूत्रबद्ध मांडणी केलेली आहे. तसं  बघायला गेलं  तर हे सगळेच टप्पे हे महत्वाचे आहेतच. पण  त्यातला १ टप्पा म्हणजे गृहस्थाश्रम. हिंदू धर्मात मनुष्याच्या जन्मापासून ते मृत्यू पर्यंत  १६ संस्कार सांगितलेले आहेत त्यात लग्न हा सुद्धा एक महत्वाचा संस्कार आहे. शास्त्रात आपल्याकडे नवं  दाम्पत्याला लक्ष्मी -नारायणाची उपमा दिली  जाते . ह्यावरूनच आपल्या संस्कृतीत ह्या नात्याला किती पावित्र्य आणि महत्वं आहे .                        ...

वेदना ...................

इमेज
                                                     वेदना........... ह्या पृथ्वीतलावर असा कोणताच सजीव प्राणी नसेल ज्याने  वेदना कधीच अनुभवलेल्या  नसतील. शारीरिक वेदना तर ह्या सगळ्यांना सारख्याच असतात. शारीरिक वेदनेचं  स्वरूप कमी जास्त प्रमाणात असलं तरीही भावना तर त्याच असतात . वेदना  म्हणजे  नक्की काय अशी व्याख्या तर नाहीये . कारण वेदना हा एक अनुभव आहे आणि तो  प्रत्येकासाठी वेगळा असतो. वेदना हा असा अनुभव आहे जो  ज्याला त्याला आपला आपलाच घ्यावा लागतो.काही शारीरिक वेदना ह्या क्षणिक असतात  तर काही दूरगामी असतात . काही शारीरिक वेदनांसाठी  कधी कधी साधी हवेची फुंकर सुद्धा पुष्कळ असते तर काही वेदनांना कितीही औषध घेतलं तरीही वेदना कधी कमी होत नाहीत. मानसिक वेदनांच्या बाबतीत अगदी तसेच असतं  ना त्यावर  कोणतं  औषध  घेता येतं  आणि ते कधी बरं  होईल ह्याचा काही ठराविक कालावधी असतो.  ...