पोस्ट्स

जून, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दान....

इमेज
                                                               दान म्हणजे आपल्या जवळ जे आहे, ते स्वतःहून चांगल्या भावनेने, कोणत्याही परतफेडीची अपेक्षा न ठेवता आणि सगळ्यात महत्वाचं आनंदाने  जे मनापासून दिलं  जातं ते  म्हणजे दान..... दान हे कधीही कोणावर लादता येत नाही. आपल्या संस्कृतीत सुद्धा दान  खूप महत्वाचं  आहे. आपल्या उपनिषदांत  विकसित व्यक्तीसाठी तीन महत्वाचे गुण आत्मसात / शिकण्यासाठी सांगितलेले आहेत. सयंम, दान  आणि दया.     ।। तदेतत्त्रयँ शिक्षेद् दमं दानं दयामिति ।।   ऋग्वेदात  दान या बद्दल खूप गोष्टी सांगिलेल्या आहेत. ऋग्वेदानुसार दान म्हणजे सत्य. चांडोक्य  उपनिषदानुसार समस्त मानव जातीसाठी जीवन जगतांना  तप, आर्जव, सत्यवचन  अहिंसा आणि दान   हे महत्वाचे सांगितलेले आहे. या वरूनच आपल्याला  असं  लक्षात येतं  की  व्यक्तीमत्व ...