शुभ विवाह .............
मनुष्य हा जन्माला आल्यापासून तर मृत्यू पर्यंत त्याच्या आयुष्यात काही टप्पे येतात. जसे की बालपण, तारुण्य आणि वृद्धत्व. जितकं माणसाचं आयुष्य त्याप्रमाणे तॊ ह्या टप्प्यातून जात असतो. आपल्या संस्कृतीत आपल्या पूर्वजांनी खूप विचार करून आणि खूप दूरदृष्टी ठेवूनच ह्या टप्प्यात असलेल्या वयात कोण- कोणत्या गोष्टींना महत्व द्यायचं ह्याची आपल्या शास्त्रांत खूप सूत्रबद्ध मांडणी केलेली आहे. तसं बघायला गेलं तर हे सगळेच टप्पे हे महत्वाचे आहेतच. पण त्यातला १ टप्पा म्हणजे गृहस्थाश्रम. हिंदू धर्मात मनुष्याच्या जन्मापासून ते मृत्यू पर्यंत १६ संस्कार सांगितलेले आहेत त्यात लग्न हा सुद्धा एक महत्वाचा संस्कार आहे. शास्त्रात आपल्याकडे नवं दाम्पत्याला लक्ष्मी -नारायणाची उपमा दिली जाते . ह्यावरूनच आपल्या संस्कृतीत ह्या नात्याला किती पावित्र्य आणि महत्वं आहे . ...