थोडंसं  Sharing ........ 



                                           Sharing हे खरं तर लहानपणा पासूनच आपल्या हे  घरात आणि  शाळेत शिकवलं जातं .आपल्याला मिळालेली गोष्ट ही  नेहमी आपल्या सॊबत असणाऱ्या लोकांसोबत वाटून घेतली पाहिजे. घरात एखादा चांगला पदार्थ आणला किंवा तॊ  बाहेरून आणला असेल तेव्हा आपण घरात  सगळ्यांनी वाटून  त्याचा आनंद घायचा हे बाळकडू लहानपणीच मिळतं . आपण देवाला जो नैवेद्य दाखवतो तो ह्या Sharing  चं  सर्वोत्तम उदाहरण आहे. प्रसाद कोणाला किती आणि कोणता मिळाला ह्या पेक्षा तॊ  उपस्थित असणाऱ्या सगळ्यांना  मिळायला हवा हे जास्त महत्वाचं असतं . प्रसादासाठी जे काही असेल अगदी तो साखर असो किंवा पेढा . त्यातला साखरेचा एक कण किंवा कधी जर पूर्ण पेढा जरी मिळाला तरी मिळणारं  समाधान हे सारखंच असतं . आपल्या मराठीत अशी म्हणंही  आहे. दिल्याने आपल्या कडे जे आहे ते वाढतं. 

                                           दर वेळी Sharing   केलं म्हणजे आपण त्या गोष्टीचे काही भाग करतो आणि एकमेकांत वाटून घेतो असं  नाही.  अश्या  बऱ्याच गोष्टी अश्या आहेत ज्या आपण Share तर करतो पण त्यांना कोणत्याही मापदंडात बसवूच शकत  नाही. आपल्याला एखाद्या  गोष्टीचा आनंद झाला की आपण तॊ  आपल्या माणसांसोबत share  करतो , आणि त्यामुळे आपला आनंद हा द्विगुणित होतो , म्हणूनच आपण समारंभ, सोहळे यांत  अवर्जून सहभागी होत असतो. Sharing   हे नेहमीच आनंदी क्षणांच्या  बाबतीत असतं  असं  नाही  काही वेळा दुःखाच्या बाबतीतही असतं. काही वेळा दुःख Share  केलं  तर आपलं कमी होतं  आणि ज्याच्या सोबत share  केलं  त्याचं  वाढतं  असं  न होता आपल्याला  त्या दुःखातून बाहेर लवकर बाहेर पडण्यासाठी एक ऊर्जा , प्रेरणा मिळते. 

                                           आज तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हे सगळं जग जोडलं गेलं आहे.  Internet , smartphone  अशी बरीच माध्यमं आहेत, ज्यामुळे माणसांना एकमेकांच्या संपर्कात येणं  खूप सोईस्कर झालं . आज एका touch  वर आपण जगातल्या कोणत्याही ठिकाणी असणाऱ्या माणसाला शोधून त्याच्या सोबत अगदी सहजपणे संपर्क साधू शकतो. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून माणूस संपर्काच्या कक्षेत आला पण ह्या संपर्कामुळे माणूस खरंच  एकमेकांशी जोडला गेला  ???? 

                                           मला असं वाटतं  की एखादा माणूस संपर्कात आला म्हणजे तो जोडला गेला असं होत नाही. याची अशी बरीच उदाहरणं देता येतील जसं  की  facebook वर आपल्या कमी  जास्त ओळख असणारी अशी कित्तेक माणसं आपल्या friend  list  मध्ये असतात. . त्यांनी  केलेल्या post वरून त्यांची माहिती कळते. WhatsApp पण अगदी तसंच  झालंय . एक group  बनवला, त्यात सगळयांना add  केलं ,  आणि मग ज्याला जमेल तसं  तो  message, photos , forwarded  post   च्या माध्यमातून टाकत असतो.असे आपले प्रत्येकाचे family , office , college , शाळा इ . कितीतरी ग्रुप असतात. काहीवेळा काही group  मध्ये असणाऱ्या member  ला आपण व्यक्तिगत जास्त ओळखत नसतो , पण तरीही आपण त्या group  मध्ये असतो.  Group  मध्ये एखाद्याला  वाढदिवसाच्या शुभेच्छा कोणीतरी देतं , त्यानंतर  जे -जे तो message बघतात ते सुद्धा इतरांप्रमाणे शुभेच्छा देतात नंतर असं समजतं  की  सदर व्यक्तीचा आज वाढदिवस नाहीये किंवा  वाढदिवस आहे  पण तो  ह्या group  चा भाग नाहीये , हे समजे पर्यंत कित्तेक जणांनी त्याला शुभेच्छा दिलेल्या असतात. असं तुमच्याबाबतीतही कदाचित झालं असेल

                                           एखाद्याने message/ post  काही टाकत असेल , त्याला आपण एखादा message  केला आणि त्याने जर त्याला उत्तर  देत असेल , तो  जमेल तसे त्याचे  status  update करत असेल, आपण ठेवलेलं status बघतही  असेल तर तो माणूस Active आहे असं आपण समजतो.  थोडक्यात काय तर तो माणूस जीवंत  आहे.  हे मी थोडं परखड आणि थोडं  स्पष्टच बॊलतॊय.  आज  इतके busy  झालोय की  आपल्याला त्या माणसाला प्रत्यक्ष भेट खूप लांबची  गोष्ट , त्याला phone  करून २ मिनटं बोलायची सुद्धा सवड मिळत नाही. आपल्याला आहे तेच व्याप काय कमी असतात त्यात का म्हणून दुसऱ्याला  phone  करायचा ????  मी  group  वर message  केलाय झालं की  त्यात आणि त्याचा Thank  you  म्हणून मला  thumb  पण आलाय. इमोजी  ह्या  खरं  तर शब्द आणि  शब्दांतून व्यक्त होणाऱ्या भावना ह्यांचा शॉर्टकट आहेत. हे   खरंय  आपण इतके busy  आहोत कुठे तो लांबलचक message  type  करायला वेळ आहे. १ एका इमोजीत बरंच  काही सांगता येतं . शक्य आहे तिथे शॉर्टकट मध्ये गोष्टी उरकण्यात आपला कल असतो. 

                                           प्रत्येकाच्याच आयुष्यात  चढ  उतार  हे येतंच असतात. असं  कोणीही एकाच ठिकाणी  कधीही रहात नाही . Sharing  च्या बाबतीतही तसंच  आहे. आपल्याला आपल्या ह्या चढ आणि उताऱ्याचा  प्रसंगात आपल्या  मनात असणारे विचार, आपल्या भावना समजून घेणारं  , ऐकून  घेणारं  कोणी तरी हवं असतं. Sharing    हे प्रत्येक वेळी  दुःखाचंच असतं  असं  नाही. काही वेळा आनंदाचं , नैराश्याचं  कॊणत्याची भावनेचं असू शकतं . आयुष्यातल्या काही प्रसंगात आपल्याला सल्ला देणारे खूप असतात पण आपल्याला समजून घेणारं , आपलं  जे काही म्हणणं  आहे ते व्यवस्थित शांतपणे ऐकून  घेणारे खूप क्वचितच असतात.  मग हा मनातला  विचारांचा  अतिरेक कमी कसा करायचा ? तर आपल्या ज्याकाही भावना आहेत त्या व्यक्त  करायच्या .

                                           हातात phone  घेतला आणि त्याच्यातल्या हजार  contact नंबर  मधून त्यावेळी असा एक तरी number  सापडतो का आपल्याला  ज्याला phone  करून आपण त्याच्या  सोबत बोलू  शकतो ?  phone  नाही तर गाडीला kick  मारून त्या माणसाला प्रत्यक्ष भेटून त्याच्या सोबत मन मोकळं  करता येईल अशी आपली  किती माणसं आहेत आपल्या आयुष्यात  याचा विचार केलाय कधी आपण ???????  जर केला नसेल तर ह्याचा आपण नक्कीच गांभीर्याने विचार करायला पाहिजे. शेवटी भावना कोणतीही असो त्या भावनेचा अतिरेक हा नेहमी त्रासदायकच असतॊ .

                                          लहान मुलं कशी सहज सांगून मोकळी होतात, रडून - हसून त्यांच्या मनात जे आहे ते सगळं व्यक्त करून मोकळी होतात तसं  मन मोकळं करता यायला हवं.आपलं  हे sharing करतांना त्या व्यक्तीची निवड खूप महत्वाची असते. अशी व्यक्ती ज्याचा सोबत आपण  विश्वासाने अगदी मन मोकळेपणाने , मनात जे असेल ते व्यक्त करता येईल.अशी माणसं  आपल्या आयुष्यात असतील तर चांगलं आहे आणि जर नसतील तर आपण अशी माणसं  शोधायला हवीत. आपण सुद्धा आपल्या मित्रांसाठी  sharing चं  माध्यम होऊ शकतो. आपण त्यांच्या मनात हा विश्वास  निर्माण करू शकतो जेणे करून  ते देखील त्यांच्या भावना मनमोकळे पणाने आपल्या सोबत share  करू शकतील.  त्याक्षणाला ती जर व्यक्ती sharing  साठी उपलब्ध राहू शकत  नसेल. ह्यात थोडा समजूतदार पणा आन संयम  सुद्धा अपेक्षित आहे. 


 लहान मुलांपासून तर मोठया माणसांपर्यन्त सगळ्यांसाठी sharing  खूप महत्वाचं आहे. मनात असणारं  हे भावनांचे ओझं  हलकं करणं , ते व्यक्त करणं खूप गरजेचं आहे.  

म्हणूनच थोडंसं  Sharing ......... 

( वर चित्रात मुद्दाम एका मोठ्या माणसाच्या हातात लहान मुलाचा हात दाखवला आहे. ज्या प्रमाणे ते लहान मूल अगदी सहज खूप विश्वासाने त्या मोठ्या हातात ठेवत आहे. अगदी तसंच  sharing  करायचं आहे ) 

                                                                                           
                                                              सुनित कुलकर्णी ...... 

























टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तो............................

वेळेचं औषध ........ पुन्हा नव्याने उभारी घेण्यासाठी

शुभ विवाह .............