थोडंसं Sharing ........
Sharing हे खरं तर लहानपणा पासूनच आपल्या हे घरात आणि शाळेत शिकवलं जातं .आपल्याला मिळालेली गोष्ट ही नेहमी आपल्या सॊबत असणाऱ्या लोकांसोबत वाटून घेतली पाहिजे. घरात एखादा चांगला पदार्थ आणला किंवा तॊ बाहेरून आणला असेल तेव्हा आपण घरात सगळ्यांनी वाटून त्याचा आनंद घायचा हे बाळकडू लहानपणीच मिळतं . आपण देवाला जो नैवेद्य दाखवतो तो ह्या Sharing चं सर्वोत्तम उदाहरण आहे. प्रसाद कोणाला किती आणि कोणता मिळाला ह्या पेक्षा तॊ उपस्थित असणाऱ्या सगळ्यांना मिळायला हवा हे जास्त महत्वाचं असतं . प्रसादासाठी जे काही असेल अगदी तो साखर असो किंवा पेढा . त्यातला साखरेचा एक कण किंवा कधी जर पूर्ण पेढा जरी मिळाला तरी मिळणारं समाधान हे सारखंच असतं . आपल्या मराठीत अशी म्हणंही आहे. दिल्याने आपल्या कडे जे आहे ते वाढतं.
दर वेळी Sharing केलं म्हणजे आपण त्या गोष्टीचे काही भाग करतो आणि एकमेकांत वाटून घेतो असं नाही. अश्या बऱ्याच गोष्टी अश्या आहेत ज्या आपण Share तर करतो पण त्यांना कोणत्याही मापदंडात बसवूच शकत नाही. आपल्याला एखाद्या गोष्टीचा आनंद झाला की आपण तॊ आपल्या माणसांसोबत share करतो , आणि त्यामुळे आपला आनंद हा द्विगुणित होतो , म्हणूनच आपण समारंभ, सोहळे यांत अवर्जून सहभागी होत असतो. Sharing हे नेहमीच आनंदी क्षणांच्या बाबतीत असतं असं नाही काही वेळा दुःखाच्या बाबतीतही असतं. काही वेळा दुःख Share केलं तर आपलं कमी होतं आणि ज्याच्या सोबत share केलं त्याचं वाढतं असं न होता आपल्याला त्या दुःखातून बाहेर लवकर बाहेर पडण्यासाठी एक ऊर्जा , प्रेरणा मिळते.
आज तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हे सगळं जग जोडलं गेलं आहे. Internet , smartphone अशी बरीच माध्यमं आहेत, ज्यामुळे माणसांना एकमेकांच्या संपर्कात येणं खूप सोईस्कर झालं . आज एका touch वर आपण जगातल्या कोणत्याही ठिकाणी असणाऱ्या माणसाला शोधून त्याच्या सोबत अगदी सहजपणे संपर्क साधू शकतो. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून माणूस संपर्काच्या कक्षेत आला पण ह्या संपर्कामुळे माणूस खरंच एकमेकांशी जोडला गेला ????
मला असं वाटतं की एखादा माणूस संपर्कात आला म्हणजे तो जोडला गेला असं होत नाही. याची अशी बरीच उदाहरणं देता येतील जसं की facebook वर आपल्या कमी जास्त ओळख असणारी अशी कित्तेक माणसं आपल्या friend list मध्ये असतात. . त्यांनी केलेल्या post वरून त्यांची माहिती कळते. WhatsApp पण अगदी तसंच झालंय . एक group बनवला, त्यात सगळयांना add केलं , आणि मग ज्याला जमेल तसं तो message, photos , forwarded post च्या माध्यमातून टाकत असतो.असे आपले प्रत्येकाचे family , office , college , शाळा इ . कितीतरी ग्रुप असतात. काहीवेळा काही group मध्ये असणाऱ्या member ला आपण व्यक्तिगत जास्त ओळखत नसतो , पण तरीही आपण त्या group मध्ये असतो. Group मध्ये एखाद्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा कोणीतरी देतं , त्यानंतर जे -जे तो message बघतात ते सुद्धा इतरांप्रमाणे शुभेच्छा देतात नंतर असं समजतं की सदर व्यक्तीचा आज वाढदिवस नाहीये किंवा वाढदिवस आहे पण तो ह्या group चा भाग नाहीये , हे समजे पर्यंत कित्तेक जणांनी त्याला शुभेच्छा दिलेल्या असतात. असं तुमच्याबाबतीतही कदाचित झालं असेल
एखाद्याने message/ post काही टाकत असेल , त्याला आपण एखादा message केला आणि त्याने जर त्याला उत्तर देत असेल , तो जमेल तसे त्याचे status update करत असेल, आपण ठेवलेलं status बघतही असेल तर तो माणूस Active आहे असं आपण समजतो. थोडक्यात काय तर तो माणूस जीवंत आहे. हे मी थोडं परखड आणि थोडं स्पष्टच बॊलतॊय. आज इतके busy झालोय की आपल्याला त्या माणसाला प्रत्यक्ष भेट खूप लांबची गोष्ट , त्याला phone करून २ मिनटं बोलायची सुद्धा सवड मिळत नाही. आपल्याला आहे तेच व्याप काय कमी असतात त्यात का म्हणून दुसऱ्याला phone करायचा ???? मी group वर message केलाय झालं की त्यात आणि त्याचा Thank you म्हणून मला thumb पण आलाय. इमोजी ह्या खरं तर शब्द आणि शब्दांतून व्यक्त होणाऱ्या भावना ह्यांचा शॉर्टकट आहेत. हे खरंय आपण इतके busy आहोत कुठे तो लांबलचक message type करायला वेळ आहे. १ एका इमोजीत बरंच काही सांगता येतं . शक्य आहे तिथे शॉर्टकट मध्ये गोष्टी उरकण्यात आपला कल असतो.
प्रत्येकाच्याच आयुष्यात चढ उतार हे येतंच असतात. असं कोणीही एकाच ठिकाणी कधीही रहात नाही . Sharing च्या बाबतीतही तसंच आहे. आपल्याला आपल्या ह्या चढ आणि उताऱ्याचा प्रसंगात आपल्या मनात असणारे विचार, आपल्या भावना समजून घेणारं , ऐकून घेणारं कोणी तरी हवं असतं. Sharing हे प्रत्येक वेळी दुःखाचंच असतं असं नाही. काही वेळा आनंदाचं , नैराश्याचं कॊणत्याची भावनेचं असू शकतं . आयुष्यातल्या काही प्रसंगात आपल्याला सल्ला देणारे खूप असतात पण आपल्याला समजून घेणारं , आपलं जे काही म्हणणं आहे ते व्यवस्थित शांतपणे ऐकून घेणारे खूप क्वचितच असतात. मग हा मनातला विचारांचा अतिरेक कमी कसा करायचा ? तर आपल्या ज्याकाही भावना आहेत त्या व्यक्त करायच्या .
हातात phone घेतला आणि त्याच्यातल्या हजार contact नंबर मधून त्यावेळी असा एक तरी number सापडतो का आपल्याला ज्याला phone करून आपण त्याच्या सोबत बोलू शकतो ? phone नाही तर गाडीला kick मारून त्या माणसाला प्रत्यक्ष भेटून त्याच्या सोबत मन मोकळं करता येईल अशी आपली किती माणसं आहेत आपल्या आयुष्यात याचा विचार केलाय कधी आपण ??????? जर केला नसेल तर ह्याचा आपण नक्कीच गांभीर्याने विचार करायला पाहिजे. शेवटी भावना कोणतीही असो त्या भावनेचा अतिरेक हा नेहमी त्रासदायकच असतॊ .
लहान मुलं कशी सहज सांगून मोकळी होतात, रडून - हसून त्यांच्या मनात जे आहे ते सगळं व्यक्त करून मोकळी होतात तसं मन मोकळं करता यायला हवं.आपलं हे sharing करतांना त्या व्यक्तीची निवड खूप महत्वाची असते. अशी व्यक्ती ज्याचा सोबत आपण विश्वासाने अगदी मन मोकळेपणाने , मनात जे असेल ते व्यक्त करता येईल.अशी माणसं आपल्या आयुष्यात असतील तर चांगलं आहे आणि जर नसतील तर आपण अशी माणसं शोधायला हवीत. आपण सुद्धा आपल्या मित्रांसाठी sharing चं माध्यम होऊ शकतो. आपण त्यांच्या मनात हा विश्वास निर्माण करू शकतो जेणे करून ते देखील त्यांच्या भावना मनमोकळे पणाने आपल्या सोबत share करू शकतील. त्याक्षणाला ती जर व्यक्ती sharing साठी उपलब्ध राहू शकत नसेल. ह्यात थोडा समजूतदार पणा आन संयम सुद्धा अपेक्षित आहे.
लहान मुलांपासून तर मोठया माणसांपर्यन्त सगळ्यांसाठी sharing खूप महत्वाचं आहे. मनात असणारं हे भावनांचे ओझं हलकं करणं , ते व्यक्त करणं खूप गरजेचं आहे.
म्हणूनच थोडंसं Sharing .........
( वर चित्रात मुद्दाम एका मोठ्या माणसाच्या हातात लहान मुलाचा हात दाखवला आहे. ज्या प्रमाणे ते लहान मूल अगदी सहज खूप विश्वासाने त्या मोठ्या हातात ठेवत आहे. अगदी तसंच sharing करायचं आहे )
सुनित कुलकर्णी ......

खूप छान sharing.. अत्यंत आवश्यक गोष्ट..
उत्तर द्याहटवाखुप सुंदर keep writing..
उत्तर द्याहटवा