Happy Ending.......................

                         


                         आज ज्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीला तिची एक ठराविक  Expiry Date  आहे. प्रत्येकाचा कालावधी कमी जास्त असेल पण एका ठराविक कालावधी नंतर ती  वस्तू / गोष्ट निरुपयोगी होते. त्यामुळेच त्या वस्तूला / गोष्टीला एका ठरविक , मर्यादित कालावधी पर्यंतच आपण तिचा वापर करू शकतो. तो कालावधी संपल्यानंतर आपल्याला त्या गोष्टी / वस्तू चा काहीही उपयोग होत नाही. ह्या सृष्टीत अशी कोणतीच गोष्ट नाही जी कायम राहणार आहे. प्रत्येकाचा कालावधी नक्कीच कमी-जास्त असेल पण कायम स्वरूपी राहणारी अशी एकही गोष्ट नाही. खरं तर हा सृष्टीचा नियमच आहे. जो कोणीही कितीही प्रयत्न केला तरीही बदलू शकणार नाही. 

                         आपण सुद्धा ह्या सृष्टीचा एक अविभाज्य घटक आहोत, त्यामुळे सृष्टीचा हा नियम आपल्याला सुद्धा तितक्याच कटाक्षाने  पाळावाच  लागतो. आपल्या आयुष्याच्या बाबतीतही काहीसं अगदी असंच आहे. फरक इतकाच आहे की  जेव्हा त्या गोष्टीची / वस्तूची निर्मिती केली जाते तेव्हाच तिच्यावर तिची असलेली Expiry Date  नमूद केलेली असते. आपल्या माणसाच्या बाबतीत आपण ज्यावेळी जन्म घेतो त्याच वेळी सुद्धा आपली Expiry Date  ही  ठरलेली असते  फक्त ती कधी आणि कशी येईल हे कोणालाच नाहीत नाही.  

                         आयुष्यात आपल्याला आपला END कसा होणार हे कधीही माहित नसतं पण आपण ज्या काही गोष्टी करतो , काही घडवत असतो त्याचा शेवट नेहमी चांगला व्हावा यासाठी प्रयत्न करतो.  एखाद्या गोष्टीचा शेवट जर मनासारखा झाला नाही तर मनाला नक्कीच हळहळ लागून राहते. एक अगदी साधं उदाहरण घ्यायचं झालेच तर आपण 2 ते 2.30 तास एखादा चित्रपट बघतो, जर त्या चित्रपटाचा शेवट आनंदी, सकारात्मक नाही झाला तर नकळत का असेना आपल्या मनाला ती हळहळ राहते, माहित असते ते खरं नाहीये पण तरीही आपण विचार करत राहतो, की असा शेवट व्हायला नको हवा होता....

                         आपल्या वास्तवातल्या आयुष्यात असंच  आहे, आपण Happy Ending होण्यासाठी प्रयत्न नक्कीच करू शकतो पण तो end happy झाला की नाही हे बघण्यासाठी आपण नसतो. आपण आयुष्यात हा सकारात्मक दृष्टिकोन ठेवून ,आपल्याला ज्या ज्या काही चांगल्या गोष्टी स्वतःसाठी, आपल्या लोकांसाठी, आपल्या समाजासाठी जे काही  करता येईल ते करत राहायचे.
                         प्रत्येक माणसाला त्यांचं असं स्वतंत्र मत असतं. ज्यावेळी २ आणि त्यापेक्षा अधिक माणसे एकत्र येतात त्यावेळी सगळ्यांचं एक मत होईलच असं नाही. माझंच मत बरोबर आणि घडणाऱ्या गोष्टी ह्या माझ्या मताप्रमाणेच घडाव्यात हे प्रत्येक माणसाला वाटणं अगदीच साहजिक आहे. पण त्याच वेळी मात्र इतरांच मत हे चुकीचंच आहे म्हणून त्यांच्या मताचा अनादर करणे योग्य नाही . त्यामुळे अश्या परिस्थितीत वाद विवाद , मतभेद करण्यापेक्षा , सगळ्यांच्या मताचा, विचारांचा आदर करून तो विषय पुढे न नेता सामोपचाराने एका चांगल्या वळणावर तो विषय संपवावा. नाते संबंधाच्या बाबतीत अगदी असंच असतं. जेव्हा तुम्ही कोणासोबत  एखाद्या नात्याच्या दृष्टीने सोबत येतात पण काही कारणांमुळे तुम्हाला ते नातं पुढे नेता येत नसेल तेव्हा एका चांगल्या note वर तुम्ही तो संवाद संपवायला हवा मी ह्या मताचा आहे. कारण भविष्यात कधी यदा कदाचित तुमची त्या व्यक्ती सोबत पुन्हा भेट झालीच , तेव्हा दोघांचीही परिस्थिती वेगळी असेलही पण तेच तुमचं जर मागचा संवाद जर चांगल्या note वर झाला असेल तेव्हा तुम्हाला संकोच राहत नाही. तुमच्या आणि त्या व्यक्तीच्या दोघांच्याही  मनात त्या शेवटच्या  चांगल्या  संवादाची आठवण राहते.   थोडक्यात काय तर मतभेद जरी असतील तरी त्या संवादाचं Happy Ending झालेलं असेल तर मनात कोणत्याच प्रकारची सल नक्कीच राहत नाही. मी या मताचा आहे. जसं तुम्ही आजवर कधीही न वाचलेली कविता तुम्ही वाचताय , तुम्ही त्यात रमलेले आहात पण ती कविता अपूर्ण असेल तर मनात ती हुरहूर कायम राहतेच.

                         आयुष्यात आनंद म्हणजे काय आणि आनंद कधी मिळतो ,कोणत्या गोष्टींतून मिळतो ह्याबद्दल प्रत्येकाचे वेगळं  मत आहे. आनंद म्हणजे काय , आणि तॊ  कशातून मिळतो ह्याचे कोणतेच असे परिमाण नाहीत. त्याचं  प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. आपल्याला आनंद मिळण्यासाठी किंवा आपण आनंद मिळवत असतांना इतरांना त्याचा त्रास होणार नाही याची कटाक्षाने काळजी घ्यायला हवी. 

                         मृत्यू हे एक वास्तव आहे जे प्रत्येकाला त्याची इच्छा असो वा नसो स्वीकारावं  लागतंच. याचा अर्थ असा होत नाही की  त्याच्या भीतीने आज  दुःखी  व्हायचं आणि जगणं  सोडून द्यायचं. उलट जे आहे ते आयुष्य मस्त आनंदात जगायचं, आयुष्यात असणारा एक-एक क्षण जगायचा, स्वताःसोबत इतरांना देखील आयुष्य आनंदी जगण्यासाठी 
प्रोत्साहित करायचं . 

                         त्यामुळे आयुष्याचा  Ending कसाही असो आपण आयुष्य जगत असताना आपण नेहमीच Happy  रहायचं आणि इतरानंही Happy करायचं  हे मात्र नक्की......... 

                                                                                                                                  सुनित कुलकर्णी

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तो............................

वेळेचं औषध ........ पुन्हा नव्याने उभारी घेण्यासाठी

शुभ विवाह .............