मनासारखं आयुष्य ........

                                                                 


                    आज वैज्ञानिक दुर्ष्टीने बघायला गेलं  तर मन हे नक्की आपल्या शरीरात कुठे , कसे दिसते ह्या बद्दल संशोधन सुरू आहे पण तरीही ते कुठे आहे हे आजवर तरी कोणाला सांगता आलेलं  नाही. हे सगळं कितीही खरं असेलं तरीही सगळ्यांनाच मन आहे. प्रत्येकालाच आपलं  आयुष्य हे आपण ठरवल्याप्रमाणे घडावं असं नक्कीच वाटत असतं. आयुष्यात  सुख  आणि दुःख  ह्याची , ते कोणत्या गोष्टी आणि माध्यमांतून मिळतं  ह्या बद्दल प्रत्येकाचं वेगळं मत आहे. त्यामुळेच सुख आणि दुःख म्हणजे नक्की काय याबद्दलची अशी विशेष व्याख्या नाही. जेव्हा आपण ठरवलेली गोष्ट ती अगदी ठरवल्या प्रमाणे झाली / घडली तर आपल्याला सुख (आनंद -समाधान) मिळतं , आणि तेच जर त्या प्रमाणे घडलं  नाही तर दुःख होतं .


                    आयुष्यात आपल्याला पुढे काय घडणार आहे हे कधी कळतंच  नाही, आपल्याला अंदाजही लावता येत नाही, जरी काही अंदाज लावला तर तो १०० % अचूक असेलच असं  आपण कधीही ठाम पणे  सांगू शकत नाही. गेल्या २ वर्षांत आपण सगळ्यांची  कॊरॊनाच्या  माध्यमातून चांगलंच  अनुभवलं  आहे. आपण आजवर कितीही संशोधन केलं, शोध लावले तरीही सृष्टीच्या काही घडणाऱ्या चांगल्या - वाईट गोष्टी आपल्या गोष्टी ह्या आपल्या हातात, आपल्या क्षमतेत नाहीतच. 

                    मला तर वाटतं आपल्या पुढे काय, कसे होणार आहे हे माहित नाही हीच खरं  तर आयुष्य जगण्यातली मजा आहे. माझे हे म्हणणं  किंवा माझा हा विचार थोडा कदाचित वेगळा वाटू शकेल पण खरंच .... आपल्याला पुढे काय घडणार आहे हे माहित नाही म्हणूनच आपलं  हे आयुष्य जगण्यात, ते अनुभव घेण्यात, आणि त्या मिळणाऱ्या  चांगल्या वाईट अनुभवांना सामोरं  जाण्याचा तॊ अनुभव वेगळाच असणार आहे. तेच जर आधीच आपल्याला समजलं तर आयुष्य जगण्यातली  मजाच निघून जाईल. एक सहजंच  उदाहरण  द्यायचं  झालं  तर जसं  की  एखादा suspense thriller चित्रपट बघण्या आधीच त्याची कथा आपल्याला कळाली  तर ज्याप्रमाणे तो चित्रपट कितीही रंजक असला तरीही तो बघण्यात आपल्याला कोणतीही उत्सुकता राहत नाही, तसेच आयुष्यातही पुढे  काहीच इच्छाच  राहणार नाही . मुळात आयुष्य आणि  चित्रपट ह्या दोन्ही गोष्टींची तुलना करणं  यॊग्य नाहीच मुळी. 

                    प्रत्येकाच्याच आयुष्यात चढ -उतार हे येत असतात. हे खरं हे  तर खूप स्वाभाविक असतें  की  आपण  आपल्या आयुष्यात  सुख, सुखाचे क्षण  स्विकारण्यासाठी  नेहमी तयार असतॊ पण तेच दुःख म्हटलं तर आपण तितकेसे तयार नसतो. पण  समोर जे चांगले - वाईट आलंय  ते स्विकारण्याशिवाय  पर्याय नसतो. प्रत्येकालाच आयुष्यात कोणत्या ना कॊणत्या गोष्टीत तडजोड ही  करावीच लागते. कोणाचंही  आयुष्य हे  Perfect  नसतं, ते आपल्याला आपल्या पद्धतीने, आपल्या कर्तृत्वाने Perfect बनवावं  लागतं.  बऱ्याच वेळा  आज आपल्या जवळ जे आहे त्यात समाधान, आनंद  मानला  तरीही आपण नक्कीच आनंदी आणि समाधानी राहू शकतोच. फक्त ते समाधान / आनंद  कशात आणि कोणत्या गोष्टीत मानायचा हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे, Rather त्याचं  प्रत्येकालाच स्वातंत्र्य आहेच.  

                    सगळयांनाच आपलं  आयुष्य हे आपण संग्रहित केलेल्या गाण्यांच्या  Playlist  सारखं  हवं  असतं, जिथे हवं  आपल्याला ते आवडणारं  गाणं  ऐकता  येतं, तेच गाणं  आवडलं  Rewind करून  पुन्हा - पुन्हा ऐकता  येतं , कंटाळा आला असेल तर Forward करून दुसरं  गाणं  लावताही येतं, तेच जर नको असलेलं एखादं  गाणं  Delete  सुद्धा करता येतं. पण वास्तवातलं आयुष्य हे  Radio  वर सुरु असलेल्या गाण्यांसारखं  असतं. केव्हा  कोणतं  गाणं  लागेल हे सांगता येत नाही, सुरु असलेलं  गाणं  कितीही आवडत असलं  तरीही परत- परत  ऐकता  येत नाही आणि तेच जर गाणं आवडणारं  नसलं  तरी  ते पूर्ण संपेपर्यंत  ऐकण्याशिवाय पर्याय नसतोच आपल्या कडे. 

त्यामुळे जे आयुष्य मिळालं आहे ते मनापासून जगायचं, त्यात येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा आनंदाने स्विकार करायचा. 


                                                                                                                           सुनित  कुलकर्णी 

  









टिप्पण्या

  1. 👍👍 Jordan Peterson यांच्या 'क्लीन युअर रूम' या तत्वापासून हे जास्त चांगल्या प्रकारे समजायला लागले.

    उत्तर द्याहटवा
  2. जीवनातील जगण्याची गंमत हीच आहे

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तो............................

वेळेचं औषध ........ पुन्हा नव्याने उभारी घेण्यासाठी

शुभ विवाह .............