ती.............
८ मार्च म्हणजे जागतिक महिला दिन. तसं बघायला गेलं तर आपण गमतीत म्हणतोच Every Day is Women's Day ८ मार्च हा फक्त औपचारिकता म्हणून साजरी केला जातो . हा गमतीचा भाग सोडला तर ८ मार्च आल्यावर सगळ्यांना ' ती ' ची आठवण येते.
खरं तर ' ती ' ला असं कोणत्याही नात्यात बांधता येणार नाहीच. ' ती ' कधी प्रेमाने काळजी घेणारी जन्मदाती म्हणून आई , तर कधी हक्काने रुबाब गाजवणारी बहीण म्हणून, कधी मनसोक्त गप्पा मारणारी मैत्रीण म्हणून, तर कधी प्रेमाची स्वप्न दाखवणारी प्रेयसी म्हणून, तर office मध्ये सोबतीत काम करणारी सहकारी (colleague) म्हणून, तर कधी आपली सहचारिणी म्हणून...... अश्या किती तरी ' ती ' आपल्या आयुष्यात असतातच. निसर्गाने खर तर हा ती आणि मी हा भेद कधी केलाच नव्हता. हा भेद खरं तर आपणच निर्माण केला आणि तो किंबहुना लहानपणापासूनच कळत नकळत मनावर बिंबवला जातोय .अगदीच एक साधं उदाहरण द्यायचं झालं तर लहान मुलाने घाबरू नये, म्हणून सहज त्याला हे बॊलले जातं , तू काय भित्री भागू बाई आहेत का ???? नकळत पणे हे त्या मुलाच्या मनात बिंबवले जातं की तो जर मुलगा आहे तर त्याला भिऊन चालणार नाही. मुली ह्या भित्र्या असतात, आणि मुलींपेक्षा आपण (मुलं Strong ) असतात , असं नकळत पणे त्याच्या मनावर लहान पणातच बिंबवले जातं . तो मोठा जरी झाला तरी त्याच्या मनात हे राहतंच . भविष्यात काही काही कठीण प्रसंग आले तर त्याला हा विचार नक्कीच येत की मी जर मुलगा आहे तर मला भिऊन चालणार नाही.
आज २१ व्या शतकात आहोत आपण ' ती ' ने सगळ्याच क्षेत्रात प्रगती केली आणि माझ्या सोबत आज ' ती ' काम करते आहे , त्यामुळे ' ती ' कुठे कमी आहे, ' ती ' ला कुठे मर्यादा आहेत असं राहिलेलं नाही. ह्या सृष्टीत परिपूर्ण असं कोणीही नाही, मराठीत सांगायचं झालं तर Perfect कोणीही ही नाही, ' ती ' आणि मी सोबत असू तर माझ्यात असणाऱ्या कमतरता ' ती ' भरून काढेल आणि तिच्यात असणाऱ्या कमतरता मी भरुन काढेल. असंच तर निसर्ग आणि ह्या सृष्टीच चक्र आजवर अविरत पणाने सुरू आहे. जर निसर्गानेच दोघांना समान अधिकार दिलेले आहेत तेव्हा आपल्याला कोण कमी आणि कोण जास्त हे ठरवण्याचा मुळात अधिकार नाहीच...
माझ्या बाबतीत सांगायचं झालं मी ' ती ' ला मोठ्या दुःखाच्या प्रसंगातून उभं राहून नवीन सुरुवात करून शून्यातून सगळं निर्माण करतांना बघितलंय , आयुष्यातल्या काही वेळा मी खचलेलो असतांना ' ती ' ने मला धीर देऊन, पुन्हा उभं राहण्याची , मला लढण्याची प्रेरणा दिली. आयुष्यातल्या कॊणत्याही प्रसंगात ' ती ' माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आणि आजही तितक्याच ताकदीने राहते . इंग्रजीत म्हण आहे There is lady behind every successful man. तसंच आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात अशी ' ती ' नेहमी असतेच
मुळातच ती आणि मी अशी तुलना करणंच चुकीचं आहे .हे तुलना करणं म्हणजे नाण्याच्या दोन बाजूंची तुलना करण्यासारखं आहे . आपण कोणतंही नाणं घेतलं तर आपण त्या दोन्ही बाजू आहेत म्हणून त्या नाण्याला किंमत आहे, त्याला महत्व आहे .असं कोणतीही एक बाजू चांगली, मौल्यवान आपल्याला ठरवता येत नाही.
आज मीडिया , TV , Mobile , Internet इ . च्या माध्यमातुन आपल्याला हे कळतं तरी, की आज ८ मार्च हा जागतिक महिला दिन आहे , पण रस्त्यावर काम करणाऱ्या, जिचे रोजचं जीवन हे हातावर असणाऱ्या, एकटीत राहणाऱ्या त्या आजीला आणि आपल्याच आजूबाजूला असणाऱ्या अश्या असंख्य ' ती ' ला ८ मार्च हा रोज सारखाच दिवस, त्यात त्यांना ह्या दिवसाचं विशेष असं काहीच वाटत नाही . त्यांना ८ मार्च हा जागतिक महिला दिन आहे सांगितल्यावर आश्चर्यच वाटतं , असा पण काही दिवस असतॊ ?????? मला इतक्या वर्षात आजही आठवतं मी माझ्या नोकरीच्या पहिल्या ठिकाणी ८ मार्च ला जागतिक महिला दिन म्हणून floor वर काम करणाऱ्या सगळ्या महिलांना Chocolate दिले होतं , त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचे ते आश्चर्याचे भाव ( expressions ) , कोणी तरी त्यांना कदाचित पहिल्यांदाच Chocolate देऊन त्यांना मिळालेला आदर बघून झालेला तॊ हा आनंद आणि असाही एक दिवस असतॊ ह्या आश्चर्याने त्यांच्या चेहऱ्यावरचे ते भाव आजही इतक्या वर्षांनी तितकेच स्पष्ट आठवतात.
कदाचित माझ्या या पुढील विधानाशी किती जण सहमत असतील मला माहित नाही पण ८ मार्च ह्या दिवाशीच का आपल्याला ती ची आठवण येते ?????? ' ती ' चा आदर करतो ????? ' ती ' ला महत्व देतो ????? वर्षातले ३६५ दिवस आपण बघत राहायचं तिच्यावर होणार अन्याय, ह्या एक दिवसापुरतं ' ती ' च्या सॊबत चांगलं वागायचं ????? रोज अगदीच Celebration नाही पण Thank you तर नक्कीच म्हणू शकतो ना ? आपल्या आईलाच ८ मार्च ला मदत करण्यापेक्षा रोज थोडी मदत केली, तिची कदर केली तर तिलाही आनंद मिळेल, छान वाटेल........
म्हणूनच ह्या १ दिवसापुरतंच महिलांना आदर देण्यापेक्षा रॊज त्यांचा आदर केला , थोडी फार मदत केली, ' ती ' ने जे काही आपल्यासाठी केलंय , करतेय त्याची जाणीव ठेवली तर नक्कीच कोणत्याही ' ती ' वर कधीही कोणताच अन्याय कधीच होणार नाही असं मला मनापासून वाटतं .
सुनित कुलकर्णी
खुपचं छान
उत्तर द्याहटवाThank you so much.....
हटवाअती सुंदर
हटवाअप्रतिम भाऊ, खूप छान....
उत्तर द्याहटवाThank you so much Kiran .....
हटवाखूप छान!
हटवाThank you
हटवाKhup Mast Sunit..Well Written
उत्तर द्याहटवाThank you
हटवाखूप छान आणि सर्व सत्य लिहिलंय सुनीत
उत्तर द्याहटवाThank you
हटवानसल्यावर किंमत कळते तिची...
उत्तर द्याहटवाछान चिंतन...
धन्यवाद...
हटवाखरंच खुप छान लिहितो,मनाला खोल जाऊन भिडत
उत्तर द्याहटवाखूप खूप धन्यवाद
हटवा