बाबा .....
बाबा .... असं व्यक्तिमत्व जे प्रत्येकाच्याच आयुष्यातला एक महत्वाचा भाग असतॊ . फक्त आपल्या नावाला ओळख देण्याइतकंच नाही तर त्याहून कितीतरी पट जे कधीच शब्दांत मांडता येणार नाही असे. आपले बाबा .... जे प्रत्येकासाठी त्यांच्या आयुष्यातले पहिले हिरो/ प्रेरणा असतात . विश्वासाने ज्यांचं बोट अगदी घट्ट धरून कोणत्याही प्रवासासाठी नेहमी तयार असायचो, ज्यांच्या खांद्यावर उभं राहून हे जग बघतांना . आपल्याला नेहमीच त्यांच्या सारखंच बनायचं असतं हे बाबाच असतात. लहानपणी त्या भातुकलीच्या खेळात कितीतरी वेळा त्यांचं अनुकरण केलेलं असेलंच.
खरं तर बाबांबद्दल मी काय लिहणार ????? कसं लिहणार ?????? ज्यांना मी २९ वर्षांपूर्वी गमावलं , खूप लहान असल्यामुळे ज्यांचा मला खूप सहवासही नाही मिळाला , जास्त आठवणी सुद्धा नाहीत. फोटोतल्या काही थोड्या आठवणी आहेत इतकंच . तरीही मी ठरवलं.......... आता मनात जे आहे ते व्यक्त करायचं आणि मोकळं व्हायचं. पण मूळातच ते आमच्यात नाहीत असं मी मानलंच नाही कधी . मी आज जे काही करतोय ते सगळं बघताय. मला कुठे मदत हवी असेल तिथे ते प्रत्यक्ष येऊ शकत नसले तरीही कोणाच्या रूपाने येऊन ते मदत करतात ,गाडीवर एकट्याने प्रवास करतांना मागच्या सीट वर , मी Guitar आणि पेटी वाजवतांना मला दाद देणारे , मी चुकत असतांना मला सावध करणारे, माझ्या एकटेपणात नेहमीच सोबत असणारे , सगळे light बंद करून जेव्हा मी विशेषतः जेव्हा मी गुरुदत्त , देवानंद यांची जुनी गाणी ऐकतो . जसे कि जाने वो कैसे लोग थे जिनके ..... तेव्हा शेजारी बसून ते सुद्धा माझ्या इतकाच त्या गाण्यांचा मनमुराद आनंद ते घेतायेत, Ashes Cricket असो किंवा मग ती Wimbledon ची Live Match पहाटेचा गजर लावून सोबत बघतायेत . असे बरेच प्रसंग आहेत जेव्हा त्यांचा सहवास , अस्तित्व मला जाणवतं . मला एखादया विषयावर लिहण्याची प्रेरणा तेच देतायेत. दिसत जरी नसले तरीही माझे बाबा कायम माझ्या सोबत होते, आहेत आणि राहतील सुद्धा......
आपल्या संस्कृतीत सुद्धा वडिलांना परमेश्वराइतकंच महत्वाचं स्थान आहे . पितृ देवता म्हटले आहे. महाभारत ह्या धर्म ग्रंथात सुद्धा पिता म्हणजे शरीरकृत् प्राणदाता यस्य चान्नानि भुंजते । क्रमेणैते त्रयोऽप्युक्ताः पितरो धर्मशासने ।। ज्याच्या माध्यमातून आपल्या शरीराची गर्भ धारणा होते , जो आपलं संरक्षण करतो आणि आपल्या अन्न व इतर गरजांची पूर्तता करणारा पिता आहे . यावरूनच माते इतकंच पिता ह्यांना आपल्या संस्कृतीत आणि शास्त्रांत महत्व दिलेलं आहे.
लहान मुलांचा विशेषतः मुलगा ह्याचा त्याच्या आई कडे जास्त ओढा असतो आणि मुलींचा त्यांच्या वडिलांकडे . आईसाठी तिचा राजा बेटा आणि वडिलांसाठी परी राणी असते. निसर्गतः ते असतंच आणि जगविख्यात ऑस्ट्रिया स्थित मज्जा शास्त्रज्ञ , मानस शास्त्रज्ञ Sigmund Freud यांनी सुद्धा हे सिद्ध केलं आहे . ह्याचा अर्थ असा अजिबात होत नाही की आई-वडील त्यांच्या मुलांवर प्रेम करतांना कोणताही भेदभाव करतात. सगळ्यांसाठी त्यांचे आई - बाबा खूप महत्वाचे असतात आणि ते असायलाच पाहिजे त्यात कुणालाही काहीच शंका असूच शकत नाही . प्रत्येक वेळी जे आपले जन्मदाते असतात त्यांनाच आपण आपले मायबाप म्हणतो असं नाही. ( ह्या विषयावर नक्कीच एक वेगळा लेख लिहून त्यात हा विषय ,मी सविस्तरपणे नमूद करणार आहे) जसं की , आपल्या धरणीला माता ,आपल्या देशाला मातृभूमी , आपल्या बोलीभाषेला मातृभाषा म्हणतो . ईश्वराला माय बाप म्हणतोच.
आपल्या सगळ्यांसाठी आई जितकी महत्वाची तितकेच बाबा सुद्धा महत्वाचे असतात . ज्याप्रमाणे जगण्यासाठी पाणी आणि हवा (ऑक्सिजन) जितके महत्वाचे तितकंच महत्व आई आणि बाबा यांचं आपल्या आयुष्यात आहे . कुंभार ज्याप्रमाणे मातीचा गोळा चाकावर ठेवून ,त्याला थोपटून नंतर त्याला हळू हळू मायेचा स्पर्श करून एक नवीन आकार देऊन सुंदर कलाकृतीची निर्मिती करतो .त्याच प्रमाणे आपल्या आयुष्याच्या बाबतींतही अगदी तसंच काहीसं आहे. आई आणि बाबा दोघे मिळून आपल्याला घडवतात . त्या आपल्या घडण्याच्या प्रवासात दोघांचंही योगदान खूप महत्वाचं आहे.
लहानपणी सगळयांनीच आपल्या आई - बाबांकडून चांगलाच मार खाल्लेला आहे . आईचं कसं तिने कितीही मारलं तरी रडायचं तर तिच्याच कुशीत जाऊन , पण बाबांच्या बाबतीत थोडं गणित वेगळं असतं , बाबा कधी ओरडले तर मग घाबरत घाबरत राहायचं , बाबा मांडीवर घेऊन बसल्यावर आपली समजूत काढल्यावर मग काय आपले पहिले पाढे पंचावन्न सुरु. .एक मात्र असायचं बाबांची एक आदर युक्त भीती नक्कीच असायची किंबहुना ती आजही आहे . बाबांना त्यांच्या कामाच्या व्यापामुळे त्यांची इच्छा असूनही मुलांना जास्त वेळ देऊ शकत नाही . त्यामुळेच मुलं आई जवळ जास्त राहतात आणि म्हणूनच मुलांचा आई कडे थोडा जास्त ओढा असतो . बऱ्याच वेळेला आई -बाबांचा ओरडा , मार तर सगळ्यांची खाल्लेला आहे . ते वय खूप अल्लड असतं त्यामुळे तेव्हा राग पटकन यायचा आणि फुगून बसायचो , असे किती तरी केलेले हट्ट, आपले रुसवे- फुगवे आई बाबांनी ते पूर्ण केलेले असतील ह्याचा हिशोब कधी करताच येणार नाही . ज्याप्रमाणे दिव्यातलं तेल आणि वात दोघे अंधकार दूर करून प्रकाश मिळण्यासाठी जाळतात आपले आई - बाबा अगदी तसेच आपल्या आयुष्यातला अंधकार दूर करण्यासाठी प्रयत्न करत असतात .
काही ठराविक परिस्थितीत नक्कीच कळत - नकळत आपण म्हणतोच अरे बाप रे !!!! , आई ग !!!!! . एखाद्यावर राग व्यक्त करतांना कोणी तर आई , वडिलांबद्दल जर अप शब्द उदगारलेले कोणालाही सहन होत नाही. माझ्या मते जो आपल्या नेहमी हक्काचा असतो तॊ आपला बाप ..... बऱ्याच वेळा कुठे वादावादीत जिथे हक्क दाखवायचा असतो , मालकी सिद्ध करायची असते तेव्हा हे माझ्या ..... चं आहे .नक्की ऐकायला मिळतंच.
बाबा म्हणजे ज्याचं कर्तृत्व हे फक्त त्याच्या नावापुरतंच नसतं . त्यांच्या नवा पलीकडे सुद्धा असं बरंच काही असतं जे आपल्या कधी समजत नाही , ज्याची आपल्याला कधी किंमत कळत नाही . आणि जेव्हा किंमत कळते तेव्हा बाबा सोबत नसतात . अगदी एक साधं उदाहरण देतो . बाबांच्या दृष्टीकोनातून , जे इवलसं पाऊल त्यांनी नुकतंच जन्माला आल्यावर बघितलेलं असतं काही वर्षांनी जेव्हा त्याच पावलात आपली चप्पल सहज बसते आहे हे बघून बाबांच्या मनात त्यावेळेस जी भावना येत असेल , ते खरं तर शब्दांत असं सांगणं अशक्य आहे . ती भावना व्यक्त करण्यासाठी समाधान , कौतुक, आनंद इतर शब्द मला खूप पोकळ वाटतात . आणि तेच मुलाच्या दुष्टीकोनातून बघितलं तर आपल्याला कधीही काहीही कमी न पडू देणाऱ्या आपल्या बाबांनी आपल्याला लहानाचं इतकं मोठं केलंय की आज त्यांची चप्पल पायात जाते आहे , त्या चपलेच्या झिजलेल्या टाचा बघून आज वर किती कष्ट केलेत ह्याची जाणीव होते आणि क्षणभर डोळ्यात पाणी येतं . आणि तो मनाशी हे ठरवतो की आता आपण त्यांचा आधार व्हायचा. त्यांची काळजी घायची आपली जबाबदारी आहे. (कर्तव्य आणि जबाबदारी ह्यात अगदी साधा पण खूप महत्वाचा फरक मला वाटतो. जेव्हा एखादं कर्तव्य म्हणून जबाबदारी पार पडतो तेव्हा ती जबाबदारी लादलेली असते अन ती पार पाडली जाते . पण तेच जेव्हा जबाबदारी म्हणून कर्तव्य स्वीकारतो तेव्हा स्वतःहून जबाबदारी घेऊन ते कर्तव्य पार पाडत असतो ) आपले आई बाबा जबाबदारीने आपली सगळी कर्तव्य पार पाडतात.
माझ्यामते सगळ्याच वयात आपल्याला बाबा जवळ हवेच असतात. जसे की आपण बाळ असतांना आईला थोडी विश्रांती मिळावी आपल्याला सांभाळणारे , जे आपण जन्माला यायच्या आधीपासूनच आपल्या भविष्य सुखकर होण्यासाठी धडपड करायला सुरुवात करणारे , ऑफिस मध्ये दिवस कसाही गेलेला असला तरीही आपल्याला हसवण्यासाठी जमेल ते प्रयत्न करणारे , आपल्याला काही दुखलं -खुपलं त्यात स्वतःच्या जीवाचं रान करणारे , कारणे काहीही असोत पण ज्या ज्या गोष्टी त्यांनां त्यांच्या लहानपणी मिळाल्या नाहीत , अनुभवता आल्या नाहीत , जे मिळवण्यासाठी त्यांनां खूप संघर्ष करावा लागला. त्या सर्व गोष्टी आपल्या मुलांना मिळाव्यात , त्यांना कोणताही संघर्ष करावा लागू नये याची नेहमी काळजी घेणारे , आठवड्याचे ६ दिवस दिवस - रात्र काम करून एक सुट्टीचा दिवस तो स्वतःसाठी न घालवता मुलांच्या आनंदासाठी घालवणारे , कधी मित्र म्हणून गप्पा मारणारे तर कधी वेळ प्रसंगी आपले कान पिळून आपल्याला दिशा दाखवणारे , आपल्याला मिळालेल्या यशात आपल्या पेक्षाही जास्त आनंदी होणारे , तर अपयशात कधी खचून गेल्यावर आपल्याला पुन्हा उभारी देणारे, आपल्या मिळवलेल्या पहिल्या पगाराचा पहिला पेढा आपल्याला भरवणारे , आपल्या लग्नात स्वतःचं वय विसरुन उत्साहाने सहभागी होणारे , आपल्या लग्नांनंतरच्या प्रवासात आलेल्या अडचणींत स्वानुभवाचे मत देणारे , आणि आपण सुद्धा बाबा झाल्यावर आपल्यातला तो बाबा , आपला तो प्रवास बघण्यासाठी बाबा कायम आपल्या सोबत हवेच असतात. शेवटी काय तर बाबा ( बाप) म्हणजे काय हे कोणत्या पुस्तकात वाचून , कोणाचे अनुभव ऐकून नाही कळत , ते स्वतः बाबा (बाप) झाल्याशिवाय नाही कळत , म्हणूनच आपल्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात बाबा जवळ हवेच असतात .
बाबा म्हणून त्यांचे कष्ट तेच असतात फक्त हा बाबा पणाचा वारसा आपण आपल्या बाबांकडून आणि तोच पुढच्या पिढीला देतो . काळ बदलला त्याप्रमाणे माणसाच्या गरजा , परिस्थिती बदलली तरीही बाबांची जबाबदारी , त्यांचे कष्ट तेच आहेत या उलट नव्या काळातली नवी आवाहनं ह्यासाठी बाबा हे नेहमीच सज्ज आहेत.
मनातले हे विचार ह्या लेखातून व्यक्त करणं खरं तर खुप कठीण होतं माझ्यासाठी . माझ्या वयाप्रमाणे विचारांची चढ उतार होत असायची . २९ वर्ष जे मनात साठलेलं होतं ते पूर्णपणे बाहेर निघालं असं मी नाही म्हणणार , पण थोडं मोकळं झाल्या सारखं वाटतंय हे मात्र नक्की .......
धन्यवाद
सुनित कुलकर्णी
+९१ ९४२२२९२८२०
काही गाणी ही अशी असतात जी ऐकल्यानंतर असं वाटतं की हे गाणं आणि यातले शब्द खरं आपल्यासाठीच साठीच लिहलेत असं वाटतं . त्यातलंच एक हे गाणं जे माझ्या खूप भावनांशी तंतोतंत जुळणारं आहे . हे गाणं तुम्ही डोळे बाद करून एकदा नक्कीच ऐकून बघा .
चित्रपट - तलाश
संगीतकार / गायक - राम संपत
गीतकार - जावेद अख्तर
(लाख दुनिया कहे ..........)
लाख दुनिया कहे तुम नहीं हो
तुम यही हो तुम यही हो
लाख दुनिया कहे तुम नहीं हो
तुम यही हो तुम यही हो
मेरी हर सोच में
मेरी हर बात में
मेरे एहसास में
मेरे जज़्बात में
तुम ही तुम हो
तुम हर कहीं हो
हो ो लाख दुनिया
कहे तुम नहीं हो
तुम यही हो तुम यही हो
हो ो लाख दुनिया
कहे तुम नहीं हो
तुम यही हो
तुम यही हो
तुमने छोड़ा
है कब साथ मेरा
थामे हो आज
भी हाथ मेरा
कोई मंज़िल कोई
रहगुज़र हो
आज भी तुम
मेरे हमसफ़र हो
जाऊं चाहे जहां
तुम वहीं हो
हो ओ ओ लाख दुनिया
कहे तुम नहीं हो
तुम यही हो तुम यही हो
हो ओ ओ लाख दुनिया
कहे तुम नहीं हो
तुम यही हो तुम यही हो
तुम यही हो तुम यही हो
तुम यही हो तुम यही हो
तुम यही हो तुम यही हो
खुश्बू बांके
हवाओं में तुम हो
रंग बांके
फ़िज़ाओं में तुम हो
कोई गाये कोई साँस गूंजे
सब सुरीली सदाओं
में तुम हो
तुमको हर रूप में
दिल है पेहचानता
लोग है बेखबर
पर दिल ही जानता
तू मेरे पास
हो दिलनशीं हो
हो ओ ओ लाख दुनिया
कहे तुम नहीं हो
तुम यही हो तुम यही हो
हो ओ ओ लाख दुनिया
कहे तुम नहीं हो
तुम यही हो तुम यही हो
तुम यही हो तुम यही हो
तुम यही हो तुम यही हो
तुम यही हो तुम यही हो
तुम यही हो तुम यही हो.

Heart touching
उत्तर द्याहटवाधन्यवाद !!!!!
हटवाअगदी अगदी ,तुम यहीं हो तुम यहीं हो....👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद !!!!!
हटवामनाच्या तळापासून लेख लिहिलास सुनीत. त्यामुळे वाचतांना डोळ्यात पाणी ओघळलं. May God bless you
उत्तर द्याहटवा